Chandrapur Result: 1 लाख म्हटल्या, प्रत्यक्षात अडीच लाखांचं मताधिक्य घेतलं; धानोरकरांच्या दणदणीत विजयामागे फॅक्टर कोणते?

Pratibha Dhanorkar win Chandrapur: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा दणदणीत विजय झाला आहे.
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar

Chandrapur Lok Sabha: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला.

'सकाळ'ची बोलताना त्यांनी १ लाखांचे मताधिक्य घेऊन विजय होईन असं म्हटलं होतं, पण प्रत्यक्षात त्यांनी २,६०,४०५ मताधिक्य घेतलं. प्रतिभा धानोरकर यांना ७,१८,४१९ मतं मिळाले, तर. सुधीर मुनगंटीवार यांना ४,५८, ००४ मतं मिळाली. प्रतिभा धानोरकर विजयी होण्यामध्ये कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले हे आपण पाहुया.

प्रतिभा यांना मिळाली सहानुभूती

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव उमेदवार निवडून आला होता. बाळू धानोरकर यांनी भाजपचे चारवेळा खासदार राहिलेले हंसराज अहिर यांचा धक्कादायकरीत्या पराभव केला होता. मात्र,त्यांचे अकाली निधन झाले. लोकसभेला एक वर्षांचा कालावधी शिल्लक असल्याने याठिकाणी पोटनिवडणूक घेणे आवश्यक होते. पण, पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. शिवाय, बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती प्रतिभा धानोरकर यांना मिळाली.

Pratibha Dhanorkar
Chandrapur Lok Sabha 2024 Election Results: सुधीर मुनगंटीवारांना धानोरकरांनी दिला धक्का! चंद्रपूर पुन्हा काँग्रेसकडे

कुणबी असल्याचा फायदा

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला. याचे पडसाद चंद्रपूरमध्ये पाहायला मिळाले. चंद्रूपरमध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप या मुद्द्यावरुन चंद्रपुरात मोठे आंदोलन उभे राहिले होते. चंद्रपूरच्या ओबीसी समाजाचा भाजपविरोधात रोष होता. त्यामुळे हा समाज प्रतिभा यांच्या पाठीशी राहिल्याचं सांगितलं जातं. सुधीर मुनगंटीवार हे एक अल्पसंख्याक आदिवासी समाजातून येतात. २०१९ पूर्वी जातीच्या मुद्द्यावरून चंद्रपूरमध्ये निवडणूक झाली नव्हती.

Pratibha Dhanorkar
Chandrapur Lok Sabha 2024 Election Results: सुधीर मुनगंटीवारांना धानोरकरांनी दिला धक्का! चंद्रपूर पुन्हा काँग्रेसकडे

सुधीर मुनगंटीवारांचा बल्लारपूर बाहेर प्रभाव कमी

सुधीर मुनगंटीवार हे सुरुवातीला लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. त्यांना राज्यातच राहायचं होतं. हा मुद्दा देखील प्रभावी ठरला. अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये असा संदेश गेला की मुनगंटीवार लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे प्रचारामध्ये काहीसा थंडपणा जाणवला. दुसरीकडे, सुधीर मुनगंटीवार यांनी आपला विधानसभा मतदारसंघ बल्लारपूर येथे विकासकामे केले आहेत. पण, त्यांचा प्रभाव संपूर्ण चंद्रपूरात जास्त दिसला नाही. ग्रामीण भागातून मतदान देखील मुनगंटीवार यांच्या विरोधात गेले.

Pratibha Dhanorkar
Nagpur Lok Sabha Election Results: नागपूरची पसंती रोडकरींच्या विकासाला, गडकरींनी दिला ठाकरेंना धोबीपछाड

हंसराज अहीर

हंसराज अहिर यांच्या नाराजीचा फटका देखील सुधीर मुनगंटीवार यांना बसला. हंसराज अहिर हे भाजपचे चारवेळा खासदार राहिले आहेत. पण, २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. आता जागा पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने बडे नेते मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले. पण, यामुळे हंसराज अहिर नाराज झाले. तिकीट न मिळाल्याने त्यांनी मुनगंटीवारांचा फारसा प्रचार केला नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील प्रचारापासून दूर राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com