
Chandrapur Shock as Medical Aspirant Ends Life Despite 99 Percentile '
Esakal
मला डॉक्टर व्हायचं नाहीय असं म्हणत एमबीबीएसला प्रवेश घेण्याआधीच एका १९ वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याच्या घटनेनं चंद्रपूरमध्ये खळबळ उडालीय. अनुराग अनिल बोरकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. नीट परीक्षेत त्याला ९९.९९ टक्के मिळाले होते. पण एमबीबीएसला प्रवेश घेण्याच्या एक दिवस आधीच त्यानं आयुष्य संपवलं. त्यानं एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात मला डॉक्टर व्हायचं नव्हतं असं म्हटलं होतं. अनुरागला उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. कॉलेजला जाण्याच्या आदल्या दिवशीच त्यानं मृत्यूला कवटाळलं. या घटनेमुळं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.