चंद्रपूर मनपामध्ये अविश्वासाचे ढग, भाजपातील अंतर्गत वाद चिघळणार; संख्याबळाचे समीकरण गुंतागुंतीचे

Chandrapur BJP Rift Deepens : भाजपच्या एका गटाने महापौर संगीता खांडेकर यांच्या निर्णयाला सभागृहात पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे अनेक महत्त्वाचे ठराव अधांतरी लटकण्याची शक्यता असून, येत्या सहा महिन्यानंतर महापौरांवर अविश्वास ठरावही येऊ शकतो, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे.
Chandrapur BJP Rift Deepens

Chandrapur BJP Rift Deepens

esakal

Updated on

चंद्रपूर, ता. ३ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भाजपमधील अंतर्गत वादाचा स्फोट येत्या काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका गटाने महापौर संगीता खांडेकर यांच्या निर्णयाला सभागृहात पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे अनेक महत्त्वाचे ठराव अधांतरी लटकण्याची शक्यता असून, येत्या सहा महिन्यानंतर महापौरांवर अविश्वास ठरावही येऊ शकतो, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे. मात्र, दुभंगलेली काँग्रेस एकत्र आल्याशिवाय अविश्वासाचे गणित बसणार नाही, हेही तेवढेच खरे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com