Chandrapur Namo Shetkari : दुष्काळात ‘तेरावा’ महिना; नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते रखडले, चंद्रपुरातील २.४४ लाख शेतकरी प्रतीक्षेत

Over 2.44 Lakh Beneficiaries Await Ninth and Tenth Instalments :चंद्रपूर जिल्ह्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नववे आणि दहावे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत.
Chandrapur Namo Shetkari

Chandrapur Namo Shetkari

esakal

Updated on: 

चंद्रपूर : जिल्ह्यातील १२ तालुके दृष्काळग्रस्तांच्या यादीत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवर शासनाने शिक्कामोर्तब केले. मात्र, दुसरीकडे बळीराज्याच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ’नमो शेतकरी महासन्मान निधी‘चा नववा आणि दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमाच झाला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेतंर्गत तब्बल २ लाख ४४ हजार ९७४ शेतकरी लाभार्थी पात्र आहेत. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना २०२९ मध्ये सुरू केली. केंद्र शासनाच्या पावलावर पाऊल ठेवून राज्य शासनानेही १५ जून २०२३ पासून ’नमो शेतकरी महासन्मान निधी‘ योजना सुरू करण्याबाबत अध्यादेश काढला.

Chandrapur Namo Shetkari
Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

मात्र, प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी २७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी तीन हजारांवर शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित योजनेच्या लाभासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया स्वतः करावी लागते.

मात्र, जिल्ह्यातील ३ हजार ४२७ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून मुकावे लागत आहे. चार हजार ३५३ शेतकऱ्यांनी आधार बँक खात्याशी जोडला नाही. त्यामुळे त्यांनाही योजनेचा लाभ घेता आला नाही. एक हजार ४०७ शेतकऱ्यांनी जमीन मोजमापची माहिती सादर केली नाही. त्यामुळे त्यांनाही नमो शेतकरी महासन्मान निधीपासून मुकावे लागत आहे.

Chandrapur Namo Shetkari
Chandrapur Amrut 2.0 : उपायुक्तांचा आक्षेप डावलून कंत्राटदाराला १२ कोटींचे देयक! अमृत-२.० मधील ७० कामे खोळंबलेली; नोटीस धाब्यावर बसवून मनपा आयुक्तांकडून भुगतान?

३७७ कोटी ९९ लाख ९६ हजार वितरित चंद्रपूर जिल्ह्यात २०२३ पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत आठव्या हप्त्यापर्यंत ३७७ कोटी ९९ लाख ९६ हजार रपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. मात्र, त्यानंतरचे हप्ते निधीअभावी अडले आहेत. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य शासनाने नवव्या आणि दहाव्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

योजनेच्या लाभासाठी पात्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ४४ हजार ९७४ लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधी हप्ता जमा होतो. केंद्र आणि राज्य शासन मिळून शेतकऱ्यांना प्रती वर्ष बारा हजार रुपये मिळतात. केंद्र शासन नियमितपणे आपला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत आहे. मात्र, राज्य शासनाने निधीअभावी आखुडता हात घेतला आहे.

मागीलवर्षी २ सप्टेंबर २०२५ रोजी सातवा हप्ता आणि २५ मार्च २०२६ रोजी आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. मात्र, त्यानंतर नववा आणि दहावा हप्ता अजूनही मिळाला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या कृषी कार्यालयात चकरा वाढल्या आहेत. यंदा एलनिनोमुळे पावसाने खंड दिला. पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला. जिल्ह्यातील पंधरापैकी बारा तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. कृषी कार्यालयाने निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com