चंद्रपूरची आलिया बनली ‘मिस ग्लोरी ऑफ आशिया’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

चंद्रपूर - अमन गांधी फिल्म प्रॉडक्‍शनतर्फे शिमला येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत चंद्रपूरच्या अलियाने बाजी मारली. ‘मिस ग्लोरी ऑफ आशिया’ हा किताब तिने पटकाविला. आलिया सध्या नागपुरात फिजिओथेरपीचे धडे घेत आहे. तिला मिळालेल्या या पुरस्काराने चंद्ररपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

काही दिवसांपूर्वीच शिमला येथे अमन गांधी फिल्म प्रॉडक्‍शनच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. देश, विदेशांतील सौंदर्यवतींनी यात सहभाग घेतला. या स्पर्धेत आलियाने सौंदर्याची भुरळ घालत ‘मिस ग्लोरी ऑफ आशियाचा’ किताब पटकाविला. आलिया २०१७ मध्ये झालेल्या मिस इंडिया कांटिनेट स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिली. 

मिस इंडिया महाराष्ट्र व मिस सेंट्रल इंडिया हा किताब मिळविला. चंद्रपुरातील बगडखिडकी परिसरात रजा कुटुंबीय वास्तव्यास आहे. तिची आई गजला रजा या न्यू इंग्लिश हायस्कूल येथे शिक्षिका आहेत. आलियाने माउंट कॉन्व्हेंट, चांदा पब्लिक आणि विद्यानिकेतन शाळेत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नागपुरात ती फिजिओथेरपीचे शिक्षण घेत आहे. पूर्वीपासूनच तिला मॉडेलिंगची आवड आहे. याच क्षेत्रात तिला करिअर करायाचे आहे.

‘‘मिस ग्लोरी ऑफ आशिया’ हा किताब मिळाल्यानंतर चित्रपटात काम करण्याविषयी ऑफर येत आहे. मात्र, शिक्षणाला आपली प्राथमिकता आहे. आपल्याला समाजकार्याची आवड आहे. समाजासाठी काही करणार आहे.’’
- आलिया रजा, मिस ग्लोरी ऑफ आशिया.

Web Title: chandrapur news aalia raja miss glory of asia award