नवीन दूधसंकलन केंद्रे सुरू करावीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

चंद्रपूर - शासनाच्या कृषिपूरक धोरणामुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात दुग्धोत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना उचित मूल्यावर दूधविक्री करता यावी, याकरिता मदर डेअरीने नवीन दूधसंकलन केंद्रे सुरू करण्याची सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मदर डेअरीच्या आढावा सभेत दिली. 

चंद्रपूर - शासनाच्या कृषिपूरक धोरणामुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात दुग्धोत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना उचित मूल्यावर दूधविक्री करता यावी, याकरिता मदर डेअरीने नवीन दूधसंकलन केंद्रे सुरू करण्याची सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मदर डेअरीच्या आढावा सभेत दिली. 

यासंदर्भातील सभा नुकतीच नागपूर येथे पार पडली. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार राजू तोडसाम, अतिरिक्त आयुक्त श्री. ठाकरे, मदर डेअरीचे राज्यप्रमुख अतुल नाकरा, विदर्भ प्रमुख निखिल देखमुख, चंद्रपूर प्रमुख पांडे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी ढोके उपस्थित होते. यावेळी दोन्ही जिल्ह्यांतील उत्पादन, संकलन व विक्री यांचा आढावा घेण्यात आला. मदर डेअरीद्वारे चंद्रपूर एमआयडीसीमध्ये 50 हजार लिटरचे दूध शीतकरण केंद्र स्थापित होणार असून, एक ते दोन महिन्यांत ते कार्यान्वित होईल, अशी माहिती मदर डेअरीचे नाकरा यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील बीएमसी, एमपीए यांचे चुकारे वेळेवर मिळत नाहीत तसेच शेतकऱ्यांची देयके विवरण वेळेवर मिळत नाहीत, अशी तक्रार समोर आली. या सर्व त्रुटी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश अहीर यांनी दिले. दुधाचे उत्पादन अधिक व्हावे, याकरिता पशुसंवर्धन विभागातर्फे वैद्यकीय सेवा व सुविधा, पशुपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त ठाकरे यांनी सांगितले. 

येथे होणार केंद्रे स्थापन 
चंद्रपूर जिल्ह्यातील कढोली-रामपूर, राजुरा-नलखडी-विहीरगाव, कोरपना-लखमापूर या मार्गावर दूधसंकलन केंद्र स्थापन करण्यात येईल. यवतमाळमध्ये घाटंजी-पारवा-घोटी, वणी तालुक्‍यातील चिखलवर्धा-नांदेपेरा-कायर, रासा-सिरपूर, नायगाव (सावंगी), पांढरकवडा तालुक्‍यात पांढरकवडा व बोरी येथे नव्याने दूधसंकलन केंद्र स्थापन करण्याची सूचना अहीर यांनी दिली. 

Web Title: chandrapur news New milk collection centers should be started says hansraj ahir