देसी बाबू इंग्लिश मेम

देसी बाबू इंग्लिश मेम

चंद्रपूर - प्रेमाला जात-धर्म-सीमेचे बंधन नसते. दोन मने जुळली की सारी बंधने तुटून पडतात. अशी बंधने तोडून आपले नवे जग निर्माण करणाऱ्या एका जोडप्याचा विवाह होऊ घातला आहे. मुलगा चंद्रपूरचा तर मुलगी शिकागोची, म्हणजे अमेरिकेची. दोघांचे  प्रेम जुळले आणि आता त्यांचा विवाह होत आहे. याच लग्नाची ही गोष्ट....

देशी मुलगा विदेशी मुलगी किंवा देशी मुलगी आणि विदेशी मुलगा विवाहबद्ध होणे ही नवी गोष्ट राहिलेली नाही. अनेक चित्रपटांमधूनही हा विषय हाताळला गेला. पण, तरीही अशा लग्नाचे  भारतीय समाजाला अप्रूप असते. तेही चंद्रपूरसारख्या छोट्या शहरात होत असेल, तर त्याचे आकर्षण अधिक. चंद्रपुरातील ताकसांडे हे उच्चशिक्षित घराणे. रामदास ताकसांडे प्राध्यापक, त्यांच्या पत्नी स्टेट बॅंकेत व्यवस्थापक. मुले वैद्यकीय क्षेत्रात नामवंत. यातीलच एक सुशांत ताकसांडे. सुशांतने मुंबईत एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथून तो एमडी झाला. किडनीतज्ज्ञ झाल्यानंतर  शिकागोमधील फिजिकल थेरपिस्ट हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. याच हॉस्पिटलमध्ये लॉरा स्टेसीज नावाची गोड तरुणी डॉक्‍टर म्हणून आधीपासून काम करीत होती. या दोघांचा परिचय झाला.

परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले. सुशांतच्या प्रेमात पडलेली लॉरा मागच्या वर्षी  त्याच्यासोबत चंद्रपूर येथेही आली होती. घरच्यांनाही लॉरा पसंत पडली. यानंतर त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. २९ नोव्हेंबर रोजी विवाहाचा मुहूर्त ठरला. या विवाहापूर्वी साखरपुडा करण्याचे ठरले. हा साखरपुडा सोमवारी रात्री चंद्रपुरात पार पडला. या सोहळ्यासाठी स्टेसीजचे संपूर्ण कुटुंब आवर्जून उपस्थित होते. या वेळी सुशांतच्या कुटुंबाकडून स्टेसीज कुटुंबाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यामुळे तेही भारावून गेले. मुलाने बौद्ध संस्कृतीनुसार विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवल्यावर तेवढ्याच आनंदाने मुलीने त्याचा मान ठेवला.

काल झालेल्या साखरपुडा कार्यक्रमात सर्वांची नजर याच मुलीवर खिळली होती. पारंपरिक भारतीय वेशभूषेत ती दिसली. सुशांत आणि लॉरा यांचा विवाह बुधवारी (ता.२९) नागपुरात ‘हॉटेल रेडिसन ब्लू’ येथे होत आहे. आजवर केवळ सेलिब्रिटींच्याच अशा विवाहांची चर्चा होत असे. मात्र, एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाचा हा आंतरराष्ट्रीय विवाह कौतुकास्पद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com