दोन ठिकाणी केल्या घरफोड्या, चंद्रपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

शहरातील साईमंदिर वॉर्डात फिर्यादीचे घर आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्याने घरात प्रवेश करून तीन मोबाईल आणि रोख असा एकूण 22 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. ही घटना 11 ऑक्‍टोबर 2019 रोजी घडली होती. फिर्यादीने घटनेनंतर रामनगर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

चंद्रपूर : कोरोनाच्या संकट काळातही पोलिस कर्मचारी आपली कामे नियमितपणे करीत आहेत. चोरीच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार घरफोडी करणाऱ्यास अटक करण्यात रामनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आले. घरफोडी आणि चोरी अशा दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आला असून, त्याच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई 20 मे रोजी करण्यात आली.

शहरातील साईमंदिर वॉर्डात फिर्यादीचे घर आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्याने घरात प्रवेश करून तीन मोबाईल आणि रोख असा एकूण 22 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. ही घटना 11 ऑक्‍टोबर 2019 रोजी घडली होती. फिर्यादीने घटनेनंतर रामनगर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

रामनगर पोलिसांची कारवाई

तसेच जलनगर वॉर्डातील एक फिर्यादी घरी झोपला असताना चोरट्याने रात्रीच्या सुमारास घराचा दरवाजा काढून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोन मोबाईल आणि रोख असा एकूण 18 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. पाच जानेवारी 2020 रोजी घडलेल्या या घटनेची तक्रारही रामनगर पोलिस ठाण्यात करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांचा तपास तांत्रिक विश्‍लेषण आणि तपास कौशल्य वापरून आरोपीचा शोध घेण्यात रामनगर पोलिसांना यश आले. आरोपीला ताब्यात घेऊन दोन गुन्ह्यातील चार मोबाईल जप्त करण्यात आले.

अवश्य वाचा - कॅन्सरग्रस्त चिमुकलीवर शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांचा खर्च; बाप झाला हतबल...मदतीचे आवाहन

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक हाके यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, रजनीकांत पुठ्ठावार, आनंद परचाके, पुरुषोत्तम चिकाटे, विकास जुमनाके यांच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrapur police arrested thive