
चंद्रपूर वीज केंद्रात भीषण आग, कारण अस्पष्ट
चंद्रपूर : चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधील कोल हँडलिंग प्लांटला रात्री अकरा वाजताच्या सुमारास मोठी आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा: 'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'
पॉवर स्टेशनच्या युनिट नंबर 8 आणि 9 साठी या कोल हँडलिंग प्लांटचा वापर होत होता. याच प्लांटमधून दोन्ही युनिटसाठी स्वयंचलित कन्व्हेअर बेल्टच्या माध्यमातून कोळसा पुरवठा केला जातो. रविवारी रात्री अचानक याच कोल हँडलिंग प्लांटच्या क्रशर हाऊसमध्ये भीषण आग लागली, ज्यामध्ये या प्लांटचं मोठं नुकसान झाल. कन्व्हेअर बेल्टचा मोठा हिस्सा यात जळाला. याचा मोठा परिणाम संच आठ आणि नऊच्या वीज निर्मितीवर होण्याची शक्यता व्यक्त होतेय. अग्निशमन विभागाच्या 4 गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं. त्याला पहाटे-पहाटे यश आलं. या आगीचे कारण मात्र समजले नसून, अधिकृत माहिती चौकशीनंतर दिली जाण्याची शक्यता आहे.
Web Title: Chandrapur Thermal Power Station Caught
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..