चंद्रपूर : घरात घुसून 'वाघाचा' महिलेवर हल्ला

जागीच ठार; सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा येथील घटना
Chandrapur tiger woman attack
Chandrapur tiger woman attacksakal

सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. मागील आठवड्यात सरडपार येथे बिबट्याने एका वृद्धावर हल्ला करून ठार केले, तर पवनपार येथे जंगलात मोहफुल गोळा करण्यासाठी गेलेल्या एकावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी साडेबारा वाजता घरात शिरून वाघाने एका वृद्ध महिलेवर हल्ला करून ठार केले. ही घटना तालुक्यातील चिकमारा येथे घडली. मृत महिलेचे नाव तुळजाबाई परसराम पेंदाम (वय ८९) असे आहे. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडीमेढा उपवन क्षेत्रात चिकमारा हे गाव येते. या गावातील तुळजाबाई परसराम पेंदाम यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी रात्री तुळजाबाईने जेवण केले. त्यानंतर त्या नवीन बांधकाम होत असलेल्या घरातील एका खोलीत झोपायला गेल्या. गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास गावात वाघ आला. पेंदाम यांच्या घरात हा वाघ शिरला. त्याने खाटेवर झोपलेल्या तुळजाबाई परसराम पेंदाम यांच्या हल्ला करून ठार केले.

त्यानंतर वाघ तुळजाबाईला फरफटत घेऊन जात होता. त्यादरम्यान खाटेचा आवाज आला. त्यामुळे घरांच्या काहीतरी झाल्याची शंका आली. त्यामुळे ते आले. तेव्हा वाघाने तेथून पळ काढला. नवीन घरातच तुळजाबाईचा मृतदेह पडून होता. या घटनेची माहिती रात्रीच वनविभागाचे अधिकारी, पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेचे शव शवविच्छेदन करण्यासाठी रात्रीच सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

सिंदेवाही तालुक्यातील जंगलालगत गावात वाघ, बिबट्याचा धुमाकुळ सुरू आहे. वाघ, बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी कित्येकदा करण्यात आली. मात्र, त्याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच तालुक्यातील सरडपार येथे बाहेर झोपलेल्या वृद्धावर बिबट्याने हल्ला करून केले होते. सरडपार येथील एक व्यक्ती जंगलात मोहफुल गोळा करण्यासाठी गेला होता. त्याच्यावरही वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा चिकमारा येथे वाघाने महिलेस ठार केले. त्यामुळे नागरिक प्रचंड दहशतीत आहे. वनविभागाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com