नोटा बदलण्याच्या शेवटच्या दिवशी तणाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

नागपूर - नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी आरबीआयने दिलेली मुदत संपायचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे ही शेवटची संधी साधण्यासाठी आरबीआयच्या  बाहेर लोकांची गर्दी केली होती. त्यात अनिवासी आणि भारतीय नागरिकांचा समावेश होता. परंतु, नोटाबंदीच्या काळात परदेशात असणाऱ्या आणि अनिवासी भारतीयांनाच जुन्या नोटा बदलून  दिल्या जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. परिणामी काही काळ तणाव निर्माण झाला. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आरबीआय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केल्यानंतर तणाव निवळला. 

आरबीआयच्या मुंबई, नागपूर, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या कार्यालयांतच जुन्या नोटा  भरता येणार होत्या. त्यामुळे मध्य भारतातील नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून भारतीयांना जुन्या नोटा बदलून दिल्या जाणार असल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बिहारसह इतर राज्यांतील नागरिकही नागपुरात नोटा बदलण्यासाठी आले होते. मात्र, त्यांची निराशा झाली. कडाक्‍यांच्या उन्हात एरव्ही गारेगार एसीमध्ये एमिग्रेशनसाठी रांगा लावणारे एनआरआय तसेच घरातल्या डब्यात, पुस्तकांत नोटा जपून ठेवणारे सर्वसामान्य असे सगळे या रांगेत उभे होते. 

कोणाच्या आईला विस्मृतीचा आजार झाल्याने, कोणाच्या मुलाला लग्नात जुन्या नोटांचा अहेर मिळाल्याने तर कुणा एनआरआयला परदेशातून आणलेल्या नोटा बदलायच्या असल्याने उन्हातान्हात हे लोक रांगा लावून उभे होते. 

जुन्या नोटा बदलविण्यासाठी आलेले सुधीर दुरुगकर म्हणाले, भारतीय नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आहेत. त्या नोटा बदलविण्याची एक संधी सरकारने द्यावी. ही मागणी करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. अनेक सामान्य नागरिकांकडे अद्याप जुन्या नोटा सापडत आहेत. त्यांना संधी देणे गरजेचे आहे. आम्ही नोटा बदलविण्यासाठी आलो असताना प्रशासनाकडून तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य करण्यात येते हे निंदणीय आहेत. आम्ही शांततेत चर्चा करीत असताना पोलिसांना पाचारण करणे आणि धमकाविणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: To change the currency on the last day stress