रेल्वे प्रवासाचा बेत आखताय, मग ही बातमी नक्की वाचा

changes in the route of twelve trains due to development works
changes in the route of twelve trains due to development works

नागपूर : उत्तर रेल्वे दिल्ली मंडळातील हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर तसेच दक्षिण रेल्वेच्या विजयवाडा विभागातील राजमुंद्री स्थानकावरील यार्ड रिमॉडलिंगची कामे हाती घेण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेसेवा प्रभावित होणार आहे. नागपूर विभागातून धावणाऱ्या एकूण बारा गाड्या परावर्तीत मार्गाने धावतील.

हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरील कामांमुळे ०२४३४ नवी दिल्ली-चेन्नई सेंट्रल राजधानी स्पेशल ट्रेन २८ डिसेंबरला नियमित मार्गाऐवजी टिळक ब्रिज, हजरत निजामुद्दीन, ओखलामार्गे रवाना झाली. ०२४३२ नवी दिल्ली-चेन्नई सेंट्रल राजधानी स्पेशल ट्रेन २९ डिसेंबरला नियमित मार्गाऐवजी रेवरी, अलवार जंक्शन, जयपूर, कोटामार्गे रवाना झाली. ०२६१६ नवी दिल्ली-चेन्नई सुपरफास्ट विशेष रेल्वे २८ ते ३० डिसेंबरदरम्यान टिळक ब्रिज, हजरत निजामुद्दीन, ओखला मार्गे धावेल. 

०२६२२ नवी दिल्ली - चेन्नई सुपरफास्ट विशेष रेल्वेसुद्धा २८ ते ३० डिसेंबर दरम्यान टिळक ब्रिज, हजरत निजामुद्दीन, ओखलामार्गे पुढे जाईल. २८ व २९ डिसेंबरला सुटणारी ०२६२६ नवी दिल्ली - थिरुवनंथपुरम सेंट्रल सुपरफास्ट विशेष रेल्वे नवी दिल्ली, गाजियाबाद, मिटवाल, आग्रामार्गे धावली. तसेच ३० डिसेंबरला सुटमारी गाडी टिळक ब्रिज, हजरत निजामुद्दीन, ओखलामार्गे धावेल.  याचप्रमाणे २८ व २९ डिसेंबरला धावणारी ०२६१८ हजरत निजामुद्दीन - एर्णाकुलम सुपरफास्ट विशेष रेल्वे हजरत निजामुद्दीन, टिळक ब्रिज, छिप्यना बुजुर्ग, मिटवाल, आग्रामार्गे धावली.

याचप्रमाणे राजमुंद्री स्थानकावरील कामांमुळे १, ४ व ८ जानेवारीला रवाना होणारी ०२८५१ विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे विजयवाडा, वरंगल, बल्लारशा, नागपूर या निर्धारित मार्गाऐवजी विशाखापट्टणम, विजयानगरम, रायगड, टिटलागढ, रायपूर, गोंदिया, नागपूर मार्गे धावेल. ३० डिसेंबर, ३ व ६ जानेवारीला रवाना होणारी ०२८५२ हजरत निजामुद्दीन - विशाखापट्टनम विशेष रेल्वे नागपूर, बल्लारशा, वरंगल, विजयवाजा या नियोजित मार्गाऐवजी नागपूर, गोंदिया, रायपूर, टिटलागढ, रायगड, विजयानगरम, विशाखापट्टनमला पोहोचेल. 

२७ डिसेंबर व ३ जानेवारीला रवाना होणारी ०८४०१ पुरी - ओखा विशेष रेल्वे विजयानगर, रायगड, टिटलागढ, रायपूर, गोंदिया, नागपूर, वर्धामार्गे पुढे जाईल. ३० डिसेंबर व ६ जानेवारीला रवाना होणारी ०८४०२ ओखा -पुरी विशेष रेल्वे वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, टिटलागढ, रायगडा, विजयानगर या बदललेल्या मार्गाने धावेल. 

३१ डिसेंबर व ७ जानेवारीला रवाना होणारी ०८५०१ विशाखापट्टणम - गांधीधाम विशेष रेल्वे विजयानगर, रायगड, टिटलागढ, रायपूर, नागपूर, वर्धा या बदललेल्या मार्गाने धावेल. ३ जानेवारीला रवाना होणारी ०८५०२ गांधीधाम - विशाखापट्टणम विशेष रेल्वे वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, टिटलागढ, रायगड, विजयानगरमार्गे धावेल.

संपादन : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com