चोरांना पकडण्यासाठी 15 किलोमीटर पाठलाग

Chase 15 kilometers to catch thieves
Chase 15 kilometers to catch thieves

किनगावराजा (जिल्हा बुलडाणा) : सावंगी टेकाळे येथील शेतकऱ्याची बैलजोडी बोलेरो गाडीत रात्रीच्या अंधारात चोरी करण्याचा डाव परिसरातील काही शेतकऱ्यांची 9 डिसेंबरच्या रात्री उधळून लावला. चोरांना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी काही युवकांनासह तब्बल चोरांच्या गाडीचा तब्बल 15 किलोमीटर पाठलाग केला.

सावंगी टेकाळे येथील शेतकरी शिवाजी विष्णू टेकाळे यांची बैलजोडी 9 डिसेंबरला रात्री गावाजवळील गोठ्यामधून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. ही बाब साठेगाव येथील काही शेतकरी कापूस विक्री करून रात्री 2 वाजताच्या सुमारास घरी येत असताना त्यांच्या लक्षात आली. काही अनोळखी व्यक्ती बैलांना बोलेरो पिकअपमध्ये टाकताना दिसून आले. त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी सावंगी येथील मित्रांना फोन करून माहिती दिली. सावंगी येथील युवक व ग्रामस्थांना गोठ्याकडे धाव घेतली. ग्रामस्थ येत असल्याचे बघून चोरांनी बैल असलेली गाडी घेवून पळ काढला. त्यांचा पाठलाग ग्रामस्थांनी सुरू केला. चोरटे गाडी घेवून देऊळगाव राजाच्या दिशेने जात असल्याचे बघून युवकांनी देऊळगाव राजा पोलिस स्टेशन घटनेची माहिती दिली. देऊळगाव राजा शहराजवळ असलेल्या कुंभारी फाट्याजवळ पोलिस व काही नागरिकांनी नाकाबंदी केली. त्याच दिशेने सावंगी येथील ग्रामस्थ पाठलाग करीत असलेली गाडी येथे पोहोचली. पुढे पोलिस तर मागे ग्रामस्थ, पळून जाण्यासाठी दुसरा मार्गच सापडला नाही. त्यामुळे चोरांनीट्यांनी गाडी तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी चालकाला पकडून देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला आणले. परंतु, सावंगी टेकाळे हे गाव किनगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये येत असल्याने गाडीसह आरोपी चालकाला किनगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी बोलेरो पिकअप वाहन व त्यातील दोन गवळ्या रंगाचे बैल (किंमत 80 हजार) ताब्यात घेण्यात आले. आरोपी शेख जाकेर शेख सत्तार (वय 40, रा.लोणार) यासह दोन आरोपींवर किनगावराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

चोरीची घटनेत वाढ
किनगाव राजा पोलिस स्टेशन अंतर्गत काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. किनगाव राजा येथील ज्ञानेश्वर चाटे यांचे दोन बैल चोरांनी महामार्गा लगत असलेल्या गोठ्यामधून चोरून नेले होते. साठेगाव येथील बैलही चोरीला गेले होते. सावंगी टेकाळे येथील विजय झोटे यांच्या बकऱ्या चोरून नेल्या. हिवरखेड पूर्णा येथील शेतकऱ्याची बैलजोडीही चोरी झाली. किनगाव राजा येथील गट क्रमांक 650 मधील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीमधून मोटारपंप चोरून नेण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांसमोर तपास करून आरोपींना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com