चेक, डेबिट कार्डचा वापर वाढला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नागपूर - पाचशे आणि एक हजारांच्या जुन्या नोटा बंद झाल्याने नागरिकांची नोटा बदलासाठी पायपीट सुरू असताना आता शाळा आणि व्यापाऱ्यांनी चेक आणि डेबिट कार्ड स्वीकारायला सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बाजारातील विविध व्यवहारांसाठी चेक आणि डेबिट कार्डचा वापर वाढला आहे. हा स्वागतार्ह बदल असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बॅंक ग्राहकांची एटीएमसमोरील रांग अजूनही कायम आहे.

हातात चलन आल्याने बाजारपेठ ग्राहक काही प्रमाणात येऊ लागलेत. परंतु, खरेदी ही चेक किंवा डेबिट कार्डद्वारेच होत असल्याचे धान्य व्यापारी प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. पूर्वी चेकद्वारे खरेदी करण्याची ग्राहकांची मानसिकता नव्हती. आज मात्र ग्राहक चेक चालतील काय, कार्ड चालेल काय, अशी चौकशी करीत आहेत. व्यवहार वाढले आहेत. हा बदल चांगला असल्याचे देशमुख म्हणाले. व्यापारीवर्ग चेक स्वीकारण्याच्या मानसिकतेत आला आहेत. ग्राहकही बदलला आहे. चेक वा कार्ड यांचा वापर करण्याच्या मानसिकतेत तो असल्याचे बाजारपेठेतून सांगण्यात आले. परंतु, नागरिकांच्या हातात पुरेसे चलन येण्यास अजून महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर बाजारपेठ पूर्ववत गजबजलेली दिसेल, असे मत काहींनी व्यक्त केले.

सांदीपनीसह अनेक शाळांमध्येही शिकवणी शुल्क भरण्यासाठी यापूर्वी फक्त रोख रक्कम स्वीकारण्यात येत होती. आता शाळांच्या प्रशासनाने त्यात बदल केला असून, चेकची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे पालकांना नोटा बदलविण्याचा त्रास कमी झाला आहे. चेकच्या सुविधेचे पालकांनी स्वागत केले आहे.

Web Title: Check, debit card use increased