शेफ विष्णू मनोहर झळकणार चित्रपटात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

नागपूर : प्रसिद्ध शेफ व सेलिब्रिटी विष्णू मनोहर लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहेत. चित्रपटात विष्णू डबल रोल करीत असून, चित्रपटाचे दिग्दर्शन नरेश बिडकर यांचे आहे.

नागपूर : प्रसिद्ध शेफ व सेलिब्रिटी विष्णू मनोहर लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहेत. चित्रपटात विष्णू डबल रोल करीत असून, चित्रपटाचे दिग्दर्शन नरेश बिडकर यांचे आहे.
वन्स मोअर चित्रपटाचे कलावंत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेते भारत गणेशपुरे, विष्णू मनोहर आणि दिग्दर्शक नरेश बिडकर यांनी आज सकाळ कार्यालयाला भेट दिली. त्यांनी या चित्रपटातील संहितेसोबतच निर्मिती करताना आलेल्या गमतीजमती व विविध प्रसंगांची माहिती दिली. विशेष म्हणजे या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांचीही दुहेरी भूमिका असून, यापैकी एक पुरुष म्हातारा त्यांनी साकारला आहे. चाची चारसोबीस चित्रपटात कमल हसन यांचा गेटअप करणारे बॉलीवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट यांनी हट्टंगडी यांचा मेकअप केला आहे. विनोदी अंगाने जाणाऱ्या या चित्रपटात रहस्यमय तसेच दोन जन्माचे नाते दाखविले जाणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की व धनश्री दळवी हे दोन नवे चेहरे यातून चित्रपटसृष्टीत पर्दापण करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chef Vishnu Manohar To be seen in the film