पूर्व विदर्भातील धानभरडाई सुरू करणार; मंत्रालयात पार पडली बैठक

Chhagan Bhujbal said will start paddy harvesting in East Vidarbha
Chhagan Bhujbal said will start paddy harvesting in East Vidarbha

नागपूर : भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांतील राईस मिलर्सच्या अडचणी दूर करण्यासाठी व धानभरडाईबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. गेले अनेक दिवस पाचही जिल्ह्यांत धानभरडाई सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने मिलर्सबरोबर करार करून धानभरडाई सुरू करावी, असे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.

राईस मिलर्सच्या प्रश्न सोडविण्याबाबत राज्यसरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळावे व सामान्य नागरिकांना योग्य दर्जाचा तांदूळ मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राईस मिलर्सने ६७ टक्के सीएमआर तांदूळ जमा करण्याची हमी द्यावी व धानभरडाई सुरू करावी.

राईस मिलर्सच्या मागण्यांवर आज सकारात्मक मार्ग काढून त्यांना धानभरडाई सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सर्व मिलर्सनेदेखील आम्ही धानभरडाई सुरू करू, असे आश्वासनदेखील मंत्री भुजबळ यांना दिले.

बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजू कारेमोरे, अव्वर सचिव पणन सुनंदा घड्याळे, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, मार्कफेडचे सरव्यवस्थापक डॉ. अतुल नेहरकर, भंडारा व गोंदियाचे प्रादेशिक व्यवस्थापक ए. डी. राठोड, गडचिरोली चंद्रपूरचे प्रादेशिक व्यवस्थापक कोरलावार, सर्व जिल्ह्यांचे पुरवठा अधिकारी, राईस मिलर्स असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com