चिचाटीचा धबधबा पर्यटकांना खुणावतोय

जामली : भरभरून वाहत असलेला चिचाटीचा धबधबा.
जामली : भरभरून वाहत असलेला चिचाटीचा धबधबा.

जामली (जि. अमरावती) : संततधार पावसामुळे मेळघाटातील निसर्गसौंदर्य बहरले आहे. त्यातच चिखलदऱ्याच्या पायथ्याशी घनदाट जंगलात असलेल्या चिचाटी गावानजीक उंच पहाडातून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करणारा ठरला आहे. विदर्भासह मध्य प्रदेशातील पर्यटक येथे गर्दी करीत असताना वनविभागाने या ठिकाणच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे.
चिखलदरा तालुक्‍यातील चिचाटी हे लहानशे आदिवासीबहुल पुणे जिल्ह्यातील माळीण गावासारखे खेडेगाव आहे. गावात गेल्यानंतर तीनही बाजूंनी डोक्‍याला लागेल असे उंचीचे पहाड आहेत. या पहाडातून कोसळणारा पाण्याचा हा धबधबा हा विलक्षण आहे. शेकडो फूट उंचावरून कोसळणारा चिचाटी गावानजीकचा धबधबा पर्यटकांच्या पसंतीला उतरला आहे. अनेक पर्यटक धबधबा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. मोथा गावातून येणारे पावसाचे पाणी धबधब्यातून कोसळल्यावर जामुननाला नदीतून पुढे जाऊन चंद्रभागा नदीत मिळते व काही अंतरावर असलेल्या बोपापूर धरणात मिळते.
मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत चिखलदरा वनपरिक्षेत्रात चिचाटी गावाचा समावेश आहे. परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील धामणगाव येथील देवगाव, हिरदामलवरून 1 किलोमीटर अंतरावर चिचाटी गावापासून 2 किलोमीटरवर धबधबा आहे. दुर्गम ठिकाणी असलेला हा धबधबा पाहण्यासाठी खडतर प्रवास करून जावे लागते.
या धबधब्यामुळे स्थानिक आदिवासींना पर्यटकांच्या गर्दीमुळे बऱ्यापैकी व्यवसाय मिळाला आहे. वनविभागाने ही बाब लक्षात घेऊन पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगल्या मार्गाची सोय करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com