

Maharashtra Leaders Unite to Pay Tribute to Former MP Datta Meghe
sakal
नागपूर : विदर्भाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व, माजी खासदार व लोकनेते दत्ता मेघे यांच्या निधनाने संपूर्ण नागपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. रात्री सव्वाआठ वाजताच्या दरम्यान निधन झाल्याचे कळल्यानंतर खामला येथील ‘मेघे हाऊस’ या त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह सर्वपक्षीय नेत्यांनी धाव घेत लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.