मुख्यमंत्र्यांवर विरोधकांचे व्यंग्यचित्रांतून ताशेरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नागपूर - कधी सिनेमातील संवाद तर कधी प्रसिद्ध कार्टून कॅरेक्‍टरच्या माध्यमातून सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यंग्यचित्रांचा  आधार घेतला. त्यांच्या कॉटेजपुढे उभारलेल्या शामियानात जणू व्यंग्यचित्र प्रदर्शनाचे आयोजन दिसून येत असून, या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

बुधवारपासून पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होत असून, सरकारला घेरण्यासाठी वातावरणनिर्मितीचा एक भाग म्हणून थेट मुख्यमंत्र्यांचेच अनेक व्यंग्यचित्र विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कॉटेजपुढील शामियानात लावले आहेत. विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत या व्यंग्यचित्रांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे लक्ष वेधले.

हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार हे आभासी दुनियेत वावरणारे डोरेमॉन असल्याचे विखे पाटील म्हणाले होते. यापूर्वीही विखे पाटलांनी चित्रपटातील प्रतिमेचा आधार घेत सरकारचे अपयश दाखविण्याचा प्रयत्न केला होता. योगदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योगदिनानिमित्त देशाला फिटनेसचे धडे दिले होते. याचेच अनुकरण करीत मुख्यमंत्र्यांनीसुद्धा जागतिक योगदिनाच्या दिवशी योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. व्यंग्यचित्रातून मुख्यमंत्र्यांच्या विविध योगमुद्रा रेखाटत राज्य सरकारच्या घोषणांवर ताशेरे ओढले आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्रची घोषणा केली होती. परंतु, राज्यात कोणतीही रोजगारनिर्मिती झाली नाही. फडणवीस सरकार हे राज्यासाठी शुभ सरकार नसून ‘दुर्भाग्य योगा’चे सरकार असल्याचे व्यंग्यचित्रांमधून दाखविले आहे.

Web Title: chief minister cartoon opposition party comment politics