मुख्यमंत्री असतानाही फोन उचलणारे भाऊ - भावना खरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नागपूर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खूप ‘बिझी’ असतात, फोन घ्यायला काही पीए असतात, असे ऐकले होते. परंतु, माझे भाऊ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना फोन स्वतःच उचलतात. मुख्यमंत्री असतानाही फोन उचलणारे हे भाऊ असल्याचा अभिमान आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची बहीण भावना खरे यांनी आपल्या भावना बोलताना व्यक्त केल्या. 

मुख्यमंत्री फडणवीस यांना सख्खी बहीण नाही. भावना खरे या चुलतबहीण आहेत. चुलतबहीण मुख्यमंत्री फडणवीस यांना दरवर्षी राखी बांधतात. ही परंपरा लहानपणापासून सुरू आहे. यात कुठेही खंड पडला नाही. आजही मुख्यमंत्री नागपुरात होते. ते भावना खरे यांच्या घरी गेले व तेथे राखी बांधून घेतली.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल साऱ्यांनाच अभिमान आहे. तसाच तो मलाही आहे, असे सांगत भावना खरे म्हणाल्या, मध्यमवर्गीयांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल एक कुतूहल असते. ते माझ्याही मनात होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर भाऊंशी आपल्याला नेहमीप्रमाणे बोलता येईल काय? हा माझ्या मनातील प्रश्‍न होता. परंतु, एकदा फोन केला तर खुद्द मुख्यमंत्रीच फोनवर बोलत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल असलेले अनामिक कुतूहल गळून पडले.

मुख्यमंत्री असतानाही फोन घेणारे, प्रत्येक एसएमएसला तत्काळ उत्तर देणारे व्यक्ती आपले भाऊ आहेत, याचा अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांचा राजकीय प्रवास माझ्यासमोर झाला आहे. त्यांना पहिले राजकीय वळण श्रीनगर येथे झालेल्या तिरंगा रॅलीने मिळाले होते. त्यावेळी आम्ही दिल्लीतच होतो. ते महाविद्यालयीन विद्यार्थी होते. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या नेतृत्वात १५ ऑगस्टला श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. 

देवेंद्र यांची ही पहिली राजकीय रॅली होती. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासात अनेक टप्पे आले. नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री अशी पदे माझ्या भावाने भूषविली. परंतु, भाऊबीज व राखीपौर्णिमा कधी चुकली नाही. 

आजही वेळ काढून मुख्यमंत्री घरी आले. बांबूने तयार केलेली राखी आज मुख्यमंत्र्यांच्या मनगटावर बांधली.

Web Title: Chief Minister Phone Brother Rakshabandhan Bhavana Khare