मुख्यमंत्र्यांनी केली जानकरांची पाठराखण 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर - नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप, त्यांच्यावर दबाव टाकल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने पशु व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर दोषारोप केल्यानंतरही निलंबनाची कारवाई होत नसल्यामुळे विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांची बाजू उचलून धरली. न्यायालयीन निवाड्यानंतर बघू तोपर्यंत कोणतीही कारवाई नाही, असे थेट बोल सुनावित मुख्यमंत्र्यांनी जानकरांना क्‍लीन चीट दिली.

नागपूर - नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप, त्यांच्यावर दबाव टाकल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने पशु व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर दोषारोप केल्यानंतरही निलंबनाची कारवाई होत नसल्यामुळे विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांची बाजू उचलून धरली. न्यायालयीन निवाड्यानंतर बघू तोपर्यंत कोणतीही कारवाई नाही, असे थेट बोल सुनावित मुख्यमंत्र्यांनी जानकरांना क्‍लीन चीट दिली. विधानसभेत विरोधी बाकावरून विरोध केला; परंतु गुरुवारी जानकरांच्या विरोधात कोणत्याही घोषणा दिल्या गेल्या नाही, हे विशेष. 

निवडणूक आयोगाने आपला अहवाल दिला. जानकर यांच्या प्रकरणात न्यायालयात कोणताही निर्णय झाला नाही. चौकशी होईल, त्यानंतर गुन्हा आहे किंवा नाही, ते ठरेल. गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच "फाशी'ची शिक्षा देण्याचा प्रकार होईल. हे नैतिकतेला धरून नाही. 

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

महादेव जानकरांवर निवडणूक आयोगाने स्पष्ट आरोप ठेवला. यापूर्वी एका मंत्र्यावर कारवाई केली. निवडणूक अधिकाऱ्यांना दबाव टाकून प्रभावित करण्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री जानकरांना कोणता न्याय देतील. 
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधीपक्ष नेते 

लोकसेवक असताना जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचे बेकायदेशीर कृत्य केले आहे. 166 नुसार हा गुन्हा ठरतो. नैतिकतेच अधिष्ठान असलेल्या या सरकारने जानकरांवर कारवाई करावी. 
- जयंत पाटील, आमदार. 

Web Title: The Chief Minister was supported jankar