मुख्यमंत्र्यांचा सलग पाचवा विजय 

devendra fadanvis
devendra fadanvis

नागपूर : भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधून सलग तिसऱ्यांदा तर आतापर्यंत एकूण पाचवेळा विधानसभा जिंकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. "सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'च्या आंदोलनाचा परिणामही येथे दिसून आला असून सुमारे तीन हजार मतदारांनी नोटाचे बटण दाबून आपल्या रोष व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसच्या आशीष देशमुख यांना 49हजार 344 मताधिक्‍याने पराभूत केले. 
मुख्यमंत्र्यांनी मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतली. ती अखेरच्या 27व्या फेरीपर्यंत कायम राखली. मुख्यमंत्र्यांना एक लाखाच्या मताधिकाक्‍याने भेट देण्याचा संकल्प भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला होता. मात्र, तो पूर्ण झाला नाही. असे असले तरी ते शहरात सर्वाधिक मताधिक्‍यांनी निवडून आले आहेत. फडणवीस यांना 1 लाख 09 हजार 237 तर आशीष देशमुख यांना 59 हजार 893 मते मिळाली. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांना 54 हजार 976 मते मिळाली होती. त्यातुलनेत यंदा कॉंग्रेसच्या मताधिक्‍यात अल्प वाढ झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रवी शेंडे यांना 8 हजार 821 तर बसपचे विवेक हाडके 7 हजार 646 मते मिळाली. मागील निवडणुकीत बसपने 16 हजार 540 मते घेतली होती. आम आदमी पार्टीचे उमेदवार अमोल हाडके यांना 1 हजार मताचा आकडा गाठण्यासाठी 27 फेऱ्यांची वाट पाहावी लागली. अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांच्या वाट्याला फक्त 334 मते आलीत. यंदा नोटांची संख्या 3 हजार 64 वर पोहोचली. ही सेव्ह मेरिट वाल्यांची असल्याचे बोलल्या जात आहे. 
ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड 
दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील चार ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे त्या मशीनला बाजूला ठेवून 27 फेरीची मतमोजणी आटोपली. त्यानंतर तंत्रज्ञाना बोलावून चारही मशीन सुधारण्यात आल्यानंतर मतमोजणी सुरू केली. सात वाजता मुख्यमंत्री मुंबईवरून नागपुरात येणार असल्याने अधिकाऱ्यांची मतमोजणीसाठी धावपळ करीत प्रक्रिया पूर्ण केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com