मुख्यमंत्र्यांचे संकेत : अग्रवालांच्या 'पीएसी'मुळे अनेकजण येणार गोत्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोक लेखा समितीच्या (पीएसी) अहवाल स्फोटक असून राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या विरोधात असल्याचे नमुद केले. त्यामुळे लोक लेखा समितीचे अध्यक्ष अग्रवाल यांच्या अहवालामुळे अनेकजण गोत्यात येणार आहे. 

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या भाजपप्रवेशानिमित्त रामदासपेठ येथील हॉटेलमध्ये आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. डिसेंबर 2014 पासूनच गोपालदास अग्रवाल भाजपच्या संपर्कात होते. किंबहुना ते मनाने भाजपमध्येच होते. त्यामुळेच त्यांच्याकडे लोक लेखा समितीचे अध्यक्षपद देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या अध्यक्षतेतील समितीने तयार केलेला अहवाल हा स्फोटक आहे. ते ज्या पक्षात होते, त्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी विरोधात हा अहवाल असल्याचे नमुद करीत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत याचे भांडवल करण्याचे संकेत दिले. गेली पाच वर्षे अग्रवाल भाजपसोबत होतेच, मात्र, त्यापूर्वीचेही पाच वर्षे ते सत्ताधारी बाकावर असताना सरकारला विदर्भाच्या मुद्‌द्‌यावर अडचणीत आणत होते. विरोधी बाकावरून आम्ही तर सत्ताधारी बाकावरून त्यांनी नेहमीच सरकारवर हल्ला चढविला, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister's hint, Agarwala's 'PAC'