Chikhaldara Municipal Election
esakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कलोती आता निवडणुकीच्या रिंगणात उतणार आहेत. त्यांनी चिखलदरा नगरपरिषदेत नगरसेवकपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पांढरी प्रभाग क्रमांक 10 ब मधून अल्लाद कलोती हे नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. अल्लाद कलोती हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगण्यात उतरल्याने सर्वांच्या नजरा या निडणुकीकडे लागल्या आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.