जाळपोळ केल्याप्रकरणी आमदार बोंद्रेंना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

चिखली - वीज वितरण कार्यालयात जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह नऊ जणांना बुधवारी अटक केली.

चिखली - वीज वितरण कार्यालयात जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह नऊ जणांना बुधवारी अटक केली.

तालुक्‍यातील केळवद परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला होता. त्यामुळे आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी केळवद येथील वीज वितरणच्या कार्यालयात गेले होते. तेथे आक्रमक झालेल्या जमावाने साहित्याची जाळपोळ केली होती. पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रे यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत चिखली न्यायालयात हजर केले आहे. आमदार बोंद्रे यांना अटक करण्यात आल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांसह नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: chikhali vidarbha news mla rahul bondre arrested