चिखली : गुंगीचे औषध देऊन आरोग्यसेविकेवर अत्याचार

तुला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करिता केसेस देतो
 अत्याचार
अत्याचार sakal

चिखली : येथून जवळच असलेल्या गोकुळ नगरातील एकाने एका आरोग्यसेविकेस तुला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करिता केसेस देतो असे म्हणून फिर्यादीसोबत जवळीक वाढवली. यातच बळजबरीने अत्याचार करत मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ती नातेवाईकांमध्ये व्हायरल करून बदनामी करण्याची तसेच फिर्यादीचे पती व फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा लेखी रिपोर्टवरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद खराटे खामगांव येथे आरोग्यसेवक पदावर कार्यरत असून पीडित आरोग्यसेविकेशी त्याची ओळख होती. यादरम्यान तुला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करिता केसेस देतो असे म्हणून फिर्यादीसोबत जवळीक वाढवली. याच ओळखीचा फायदा घेत मेहकर फाटा परिसरातील बापूजी ट्रेडर्स मागील खोलीत नेत स्प्राईट मध्ये गुंगीचे औषध देवून अत्याचार केल्याची तसेच या संबंधाचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याची फिर्याद पीडित आरोग्यसेविकेने चिखली पोलिसांत दिली आहे. व्हायरल व्हिडीओची वारंवार धमकी देवून अनेकवेळा जबरदस्ती अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले असून आरोपी विनोद खराटे याने पीडित महिलेच्या पतीलासुद्धा अश्‍लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून सदर पिडीताने चिखली पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांनी विनोद खराटे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि प्रवीण तळी करीत आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग :

चिखली : अमडापूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केल्याचीघटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबरला दुपारी सदर घटना घडली. आरोपी शरद माणिकराव गवई याची तिच्यावर वाईट नजर होती. दुपारी गावात वर्दळ कमी असल्याची संधी साधत त्याने त्या उद्देशाने मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने सुटका करून घेतली. संध्याकाळी सदर प्रकार तिने आई- वडिलांना सांगितल्यानंतर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com