चिकना ः विजेच्या धक्‍क्‍याने उपसरंपचाचा मृत्यू

file photo
file photo

नागपूर (कामठी) : कामठी तालुक्‍यातील चिकना-बोरगावचे उपसरपंच अनिल बालकदास मानवटकर (वय 43) यांचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली.
बोरगाव-चिकनाचे उपसरपंच अनिल मानवटकर शेती करतात. दररोजप्रमाणे आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास ते ओलित करण्यासाठी शेतात गेले. ओलित केल्यानंतर ते पाण्याची मोटार बंद करण्यासाठी मुख्य स्वीच बंद करीत असताना उघड्या विजेचा तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या शेतात काम करणारा गडी रंगराव मानवटकर सकाळी सहा वाजता शेतात पोहोचल्यावर अनिल यांचा मृतदेह दिसला. रंगरावने घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. अनिल मानवटकर यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली, कॉंग्रेसचे कार्यकर्ते असलेले अनिल मानवटकर यांच्या कुटुंबीयांना कामठी तालुक्‍यातील कॉंग्रेस नेत्या प्रा. अवंतिका लेकुरवाळे, सरपंच नंदू खेटमले, संभाजी गावंडे, महावितरणचे अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्याच्या पश्‍चात पत्नी मनीषा, वेंदात व रोहित, अशी दोन मुले व वडील यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.
महावितरणचे दुर्लक्ष
महावितरण कंपनीचे कर्मचारी वेळोवेळी शेतपंपाच्या जोडणीची तपासणी करीत नसल्याने हा प्रकार घडला असून महावितरणने मृताच्या कुटुंबीयास पाच लाखांची मदत द्यावी, अशी मागणी प्रा. अवंतिका लेकुरवाळेसह गावातील नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com