संततधार पावसामुळे भिंत पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : संततधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका चारवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील रामपुरी येथे घडली. सोहम सचिन वनस्कार असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : संततधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका चारवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील रामपुरी येथे घडली. सोहम सचिन वनस्कार असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
मागील काही दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक घरे कोसळली असून, मातीच्या भिंती पडण्याच्या घटना घडत आहेत. सोहम हा घरी झोपला होता. अशात घराची भिंत कोसळली. त्यात त्याचा दबून मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले. उपचारासाठी मेंडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child dead due to wall collapse

टॅग्स