
चिमुकल्याला पालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम शेतकरी सचिन जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते जानी सोलंकी तसेच पोलिस जमादार अमृत राठोड, जमादार विजय राठोड यांनी केले. आरशद आई-वडिलांजवळ सुखरूप पोहोचल्याने कुंटुबीयांना आनंद झाला.
आर्णी (जि. यवतमाळ) : कोळवण पांदण रोडवरील कोळवण शेतशिवारात तीन वर्षीय चिमुकला एकटाच रडत होता. या चिमुकल्या आरशद शेखला शेतकरी सचिन जयस्वाल यांनी दुचाकीवर बसवून आर्णी पोलिस स्टेशनला आणले. जमादार अमृत राठोड यांनी चिमुकल्याला पोलिस स्टेशन परिसरातील प्रभागात फिरविले. परंतु, आरशदला कोणीच ओळखत नव्हते. सोशल मीडियवार फोटो व्हायरल केला असता वडील ख्वाजा शेख घ्यायला आले. आरशदला पाहताक्षणीच अश्रू अनावर होऊन चिमुकल्याला मिठी मारली.
ख्वाजा पाशू शेख हे मुबारकनगर आर्णी येथे पत्नी व आरशदसह राहतात. ख्वाजा शेख चालक आहे. ख्वाजा शेख हे यवतमाळ येथे खाजगी वाहन घेऊन गेले होते. घरी पत्नी व आरशद दोघेच होते. आई कामात व्यस्त असताना मुलगा घराजवळच खेळत आहे, असा झाला. परंतु, आरशद अंदाजे तीन ते चार किलो मिटर लांब आला आणि एकटाच कोळवण पांदण रस्त्यावर रडत होता.
अधिक वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला
तिथून जात असलेले शेतकरी सचिन जयस्वाल यांना आरशद दिसला. त्याला नाव विचारले काही सांगितले नाही. यामुळे ते चिमुकल्याला घेऊन पोलिस स्टेशनला आले. पोलिसांनी आई-वडिलांचा शोध घेतला असता ते मिळाले नाही. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जानी सोलंकी यांना झाली. त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन चिमुकल्याचे फोटो व्हॉटसॲपवर टाकले.
यानंतर चिमुकल्याचे नाव आरशद ख्वाजा शेख (वय तीन, रा. मुबारकनगर, आर्णी) असे असल्याचे समजले. वडील ख्वाजा शेख हे एकुलत्या एक चिमुकल्याला घेण्यासाठी पोलिस स्टेशनला आले. मुलाला पाहताच ख्वाजा शेख यांना अश्रुअनावर झाले. अश्रुधारेनी चिमुकल्या आरशदला मिठी मारली.
चिमुकल्याला पालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम शेतकरी सचिन जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते जानी सोलंकी तसेच पोलिस जमादार अमृत राठोड, जमादार विजय राठोड यांनी केले. आरशद आई-वडिलांजवळ सुखरूप पोहोचल्याने कुंटुबीयांना आनंद झाला.
जाणून घ्या - ‘जे जे करणं शक्य असेल ते माझ्या नागपुरात करील’; मुख्यमंत्री असं का म्हणाले...
तीन वर्षीय आरशद मुबारकनगर ते कोळवण पांदण रस्ता असा तीन ते चार किलो मिटर पायदल कसा आला? आरशदला कोणी आणले होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात मुलांना पळवणारी टोळी तर सक्रिय झाली नाही ना, अशी चर्चा आहे. यामुळे पालकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.