अभ्यासासाठी रागविल्याने बालकाने सोडले घर

Child
Child

नागपूर - अभ्यासासाठी दम देणाऱ्या वडिलांच्या रागावर आठवर्षीय मुलाने घर सोडले. भटकत नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला पाहताच चौकशी केली. त्याला नीट पत्ता सांगता येत नव्हता. तो सांगत असलेल्या परिसरातील नगरसेवकांशी संपर्क साधला.

मतदारयादीतून पालकाचा शोध घेतल्यानंतर त्याला वडिलांच्या स्वाधीन केले.
घर सोडणारा मुलगा गांधीबाग परिसरातील रहिवासी आहे. घर सोडल्यानंतर फिरता फिरता तो नागपूर स्थानकाच्या फलाट क्र. एकवर पोहोचला. आरपीएफ जवानांचे मुलावर लक्ष पडले. शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी मुलाची विचारपूस सुरू केली. लागलीच त्याने घर सोडल्याची माहिती दिली.

पत्ता विचारला असता केवळ गांधीबाग एवढेच सांगत होता. आई-वडील आणि घरच्या अन्य सदस्यांची नावे मात्र नीट सांगितली. जवानांनी मतदारयादीतून पालकांचा शोध घेण्याची युक्ती शोधली. गांधीबाग प्रभागाच्या नगरसेवकांसोबत संपर्कसाधून मतदारयादीतून मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेण्याची सूचना केली. यादीतूनच वडिलांचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता मिळाला. नगरसेवकाने संपर्क साधून वडिलांना मुलगा आरपीएफ ठाण्यात सुरक्षित असल्याची माहिती दिली. काहीवेळातच आई-वडिलांनी ठाणे गाठून मुलाला ओळखले. या मदतीसाठी पालकांनी आरपीएफ जवानांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com