रातोरात चिल्लरसाठी धावाधाव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री हजार आणि पाचेशची नोट बंद करण्याचा धाडसी निर्णय जाहीर केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. यामुळे घरच्या आलमारीतील हजार, पाचशेची नोट कोण घेणार, पेट्रोल कसे भरायचे, भाजी कशी आणायची आणि चिल्लर कोण देणार? याची चिंता सर्वसामान्यांना लागली आहे. निर्णय ऐकून रात्रीपासूनच एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. 

पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार बुधवारपासूनच पाचशे व हजाराच्या नोटांचा वापर बंद होणार आहेत. ज्यांच्याकडे नोटा आहेत त्या स्वतःच्या बॅंक व पोस्टाच्या खात्यात जमा करायच्या आहेत. विशेष म्हणजे उद्या बॅंकेचे सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. दोन दिवस पेट्रोल पंप, इस्पितळांमध्ये शुक्रवारपर्यंत या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. पुढील 72 तासात रेल्वे आणि विमानाचे तिकीट काढता येणार आहे. हाच थोडाफार दिलासा यातून मिळणार आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याची मागणी योगगुरू रामदेवबाबा यांनी केली होती. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपनेसुद्धा विदेशातील काळे धन भारतात आणण्याची घोषणा केली होती. याचाच एक भाग म्हणून तीन लाखांच्या वरचे रोखीचे व्यवहार पंतप्रधानांनी यापूर्वीच बंद केले आहेत. 

गृहिणी चिंतित 
सहाव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन लाखाच्या घरात गेले आहे. यामुळे प्रत्येकच्या तिजोरीत पाचपंचवीस हजार रुपये पडले आहेत. भविष्यात केव्हाही गरज पडू शकते याकरिता महिलांना घरी पैसे साठवून ठेवायची सवय आहे. हा सर्व पैसा आता बाहेर काढावा लागणार आहे. त्यामुळे गृहिणीही चिंतित पडल्या आहेत. 

व्यापारी अडचणीत 
छोटे-मोठे व्यापारी रोज रोखीने व्यवहार करतात. त्यांच्या गल्ल्यात हजार, पाचशे नोटांचा खच पडलेला असतो. उद्यापासून त्या कोणी घेणार नाही. याशिवाय प्रत्येक ग्राहकाला देण्यासाठी चिल्लर आणायची कुठून असा प्रश्‍न त्याला भेडसावत आहे. याशिवाय सर्व पैसा बॅंकेत जमा करावा लागेल. यामुळे वरकमाई कशी ऍडजेस्ट करायची असा प्रश्‍न व्यापाऱ्यांना पडला आहे. 

नोटांचे भाव पडले 
पंतप्रधानांच्या निर्णयाने रातोरात रुपयांचे भाव कोसळले. इतवारीत अनेक व्यापाऱ्यांनी पाचशेच्या नोटेसाठी चारशे रुपये देण्याचा व्यवसाय सुरू केला. काळ्या पैसेवाल्यांनी इतवारीत गर्दी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Chiller for overnight stampede