esakal | सुविधा पुरवून व्हावा क्रांतिभूमीचा उद्धार! मूलभूत सुविधांसाठी संघर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

सुविधा पुरवून व्हावा क्रांतिभूमीचा उद्धार!

सुविधा पुरवून व्हावा क्रांतिभूमीचा उद्धार!

sakal_logo
By
जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : मूलभूत सुविधा (Infrastructure) मिळाल्या तर इतर बाबींशी स्थानिकांना फारकाही देणे-घेणे नसते. परंतु, चिमूर तालुक्यात याच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांची ओरड सुरू आहे. चिमूर नगर परिषद स्‍थापनेला पाच वर्षे लोटूनही ग्रामसभेत दिलेल्‍या आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही (Promises are not fulfilled). नगर परिषदेत समावेश झाल्याने गावातील शेतकरी, रोजगार हमी योजनेतील जॉब कार्डधारक, महिला, अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नाही (Citizens do not get the benefit of the schemes). आमचे गाव नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला. आता सुविधा पुरविणार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. (Chimur-Municipal-Council-was-formed-but-the-question-has-not-changed)

नगर परिषदेत समाविष्ट गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. वडाळा पैकू, पिंपळनेरी, सरकाडा व गडपिपरी गावात भीषण पाणीटंचाई आहे. पारंपरिक पाण्याचे स्त्रोत नष्ट केल्याने पाणीपातळी खालावली. शहिदांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाकडे होणार दुर्लक्ष अक्षम्य आहे. स्थानिकांना सुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधींचे पहिले कर्तव्य असून, ते त्यांनी पूर्ण करावे. एवढेच.

हेही वाचा: धारदार शस्त्राने वृद्धेचा गळा कापून खून; पती गेले होते मुलीकडे

शेडेगाववासीयांच्या व्‍यथा ऐकून चिमूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. प्रवासात चिमूरच्या ऐतिहासिक क्रांतीविषयी माहिती जाणून घेतली. चिमूरचा रक्‍तरंजित क्रांती इतिहास जिवंत झाला. मात्र, इतिहासाचे मूक साक्षीदार असलेला लोखंडी पूल, डाक बंगला, अभ्यंकर मैदान इत्‍यादी पाऊलखुणांचे जतन झाले नाही. येणाऱ्या पिढीला चिमूरचा जाज्‍वल्‍य इतिहास केवळ पुस्तकातून वाचायला मिळेल, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. बंद असलेला अंबिका पॉवर प्लॉन्ट सुरू झाल्यास अनेकांना रोजगार मिळेल. यासाठी शासन तथा स्थानिक नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. श्रीहरी बालाजी देवस्थान आणि चिमूर क्रांतीनिमित्त बांधलेल्या अभ्यंकर मैदान येथील शहीद स्मारकास भेट दिली.

नगरपरिषदेची निर्मिती २०१५ मध्ये

राज्याच्या धोरणानुसार चिमूर नगरपंचायत स्थापन करण्याविषयी शासनाचे पत्र आले. मात्र, चिमूर ग्रामपंचायतीच्या आमसभेत सदर प्रस्ताव फेटाळण्यात आला. चिमूर तथा ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट केसलापूर व कवडशी रोडी मिळून १५ हजार ८७ एवढीच लोकसंख्या असल्याने नगर परिषद बनविणे शक्य नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चिमूर नगर परिषद बनविण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. दिलेल्या आश्वासनाला जागत आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी अशक्य शक्य करून दाखविले. ३० मे २०१५ रोजी चिमूर नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली.

हेही वाचा: कॉफी पिण्याचे हे आहेत फायदे आणि नुकसान; जाणून घ्या माहिती

निधी वाढला तशी कामेही झाली

नगर परिषद क्षेत्राच्या विकासासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी स्‍वतः पुढाकार घेऊन निधी आणला. चिमूर नगर परिषद क्षेत्रात सिमेंट रस्‍ते, कव्‍हर नाली तथा पेव्हिंग ब्‍लॉक लावण्याची कामे झाली. दलित वस्‍ती सुधारणा निधीअंतर्गत प्रभाग क्रमांक १२ व १५ मध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. सार्वजनिक बांकाकाम विभागाअंतर्गत २०१५ पासून तर २०२१ पर्यंत ८८ कोटी ८० लाख ९४ हजार रुपये मंजूर करण्यात आले. यात खनिज विकास निधी ८ कोटी मंजूर झाले. यात सिमेंट काँक्रीट रोड, नाल्‍या, पाइप नाली तथा चेंबरची कामे चिमूर नगर परिक्षेत्रात करण्यात आली. आमदार भांगडिया यांच्याकडून आमदार निधी १ कोटी २३ लाख ५० हजार मंजूर झाले. यातून सातनाल्‍यावर संरक्षण भिंत, उमा नदीवर मासळ व चिमूरच्या बाजूने संरक्षण भिंत, तलाठी निवासस्थान, उपजिल्हा रुग्णालयात शेडचे बांधकाम, आयटीआयमधील पहिल्‍या माळ्याचे बांधकाम, उपकोषागार कार्यालयाची संरक्षण भिंत आदी कामे करण्यात आली. तर चिमूर नगर परिषदेकरिता मंजूर ७ कोटींचा निधी न मिळाल्याने कामे अर्धवट आहेत.

म्हसली ग्रामपंचायतीला सरडपार जोडले असले तरी शासकीय रेकॉर्डला आॅनलाइन यंत्रणेशी जोडलेले नाही. त्यामुळे गावकरी विविध लाभांपासून वंचित आहेत. सरडपार गावाला त्वरित ऑनलाइन करावे. अनधिकृतरीत्‍या म्‍हसली ग्रामपंचायतीस जोडले असल्याने सरडपार या स्‍वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती करावी. लोकशाहीप्रधान देशात गावकऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात आले. चिमूर नगर परिषदेची निर्मिती झाली यात आमचा काय गुन्हा.
- सदानंद बाबूराव धारणे, माजी ग्रामपंचायत सदस्‍य, सरडपार

हेही वाचा: भारतीय संस्कृतीचा मूलाधार देशी गाय; गायीची माता म्हणून पूजा

शेडेगाव ग्रामपंचायत चिमूर नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ठ करण्यासाठी घेतलेल्‍या ग्रामसभेत उपथिस्‍तांना पाच लाखांचे घरकुल, शुद्ध पाणी, जाळीचे कुंपण, उमा नदीवर संरक्षण भिंत, बस थांबा, लोडशेडिंगमुक्‍त गाव, बालोद्यान आदी बाबू पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत एकाचीही पूर्तता झाली नाही. ही शेडेगाववासीयांची फसवणूक आहे. दिवाबत्ती व पांदण रस्‍त्‍याची कामे रखडली आहेत. पांदण रस्त्यांअभावी शेतकरी अडचणीत आहेत.
- प्रमोद मासुरकर, माजी सरपंच, शेडेगाव

(Chimur-Municipal-Council-was-formed-but-the-question-has-not-changed)

loading image