esakal | धारदार शस्त्राने वृद्धेचा गळा कापून खून; पती गेले होते मुलीकडे
sakal

बोलून बातमी शोधा

धारदार शस्त्राने वृद्धेचा गळा कापून खून; पती गेले होते मुलीकडे

धारदार शस्त्राने वृद्धेचा गळा कापून खून; पती गेले होते मुलीकडे

sakal_logo
By
शरद केदार

चांदूरबाजार (जि. अमरावती) : घरात एकटी असलेल्या वृद्धेचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. गिरजाबाई अण्णा अमझरे (वय ७५, रा. ब्राम्हणवाडा थडी) असे मृत महिलेचे नाव आहे. लुटमार करण्याच्या उद्देशाने सुद्धा वृद्धेचा खून झाल्याची शक्यता पोलिस पडताळून बघत आहेत. (Murder-by-cutting-the-throat-of-an-old-woman-with-a-sharp-weapon-in-Amravati)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी गिरीजाबाईचे पती हे गावातील मुलीच्या घरी गेले होते. थोड्या वेळाने घराकडे परत आले असता त्यांना पत्नी गिरजाबाई या खाटेवर मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. वृद्धेच्या गळ्यात एक छोटी सोन्याची पोत होती. ती सुद्धा मृत्यू झाल्यानंतर दिसली नाही. त्यामुळे लुटमार करण्याच्या उद्देशाने सुद्धा वृद्धेचा खून झाल्याची शक्यता पोलिस पडताळून बघत आहेत.

हत्येच्या घटनेनंतर ब्राम्हणवाडा थडी पोलिसांसह स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपासच्या लोकांसोबत चर्चा केली. गिरीजाबाईची हत्या कुणी आणि कशासाठी केली, ही बाब कळू शकली नाही. ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारी ब्राम्हणवाडा थडी येथे तळ ठोकून होते. पोलिसांनी याप्रकरणी काही लोकांची चौकशी केली.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

सीआरपीएफ जवानाकडे तीन लाखांची घरफोडी

अमरावतीत गुरुवारी केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलात (सीआरपीएफ) कार्यरत हवालदाराच्या निवासस्थानी धाडसी घरफोडी झाल्याची घटना घडली. दिनकरराव जोगे हे श्रीनगर येथे तैनात असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली. दुपारी काही तासांसाठी त्यांची पत्नी मार्केटमध्ये गेली होती. चोरट्याने बंद घराला लक्ष्य केले. भरदिवसा घरातून जवळपास १२५ ग्रॅम सोन्याचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम, असा ऐवज लंपास केला. जोगी यांच्या कुटुंबीयांनी घटनेची तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल केली आहे.

(Murder-by-cutting-the-throat-of-an-old-woman-with-a-sharp-weapon-in-Amravati)

loading image