परभणी जिल्हा बँक अध्यक्षपदी चोखट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

परभणी - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांची उमेदवारी अवैध ठरविल्यानंतर अखेर त्यांच्याच गटाचे संचालक पंडितराव चोखट यांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी बाजी मारली. विरोधात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटाचे विजय जामकर यांचा पराभव झाला. 

विद्यमान अध्यक्ष कुंडलिकराव नागरे यांच्या निधनामुळे अध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी (ता.१५) ही निवडणूक झाली. त्यात वरपूडकर यांचे पारडे जड मानले जात असताना त्यांच्या तिन्हीही उमेदवारी अर्जावर भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी अक्षेप घेतला. त्यामुळे विद्यमान उपाध्यक्ष चोखट यांची उमेदवारी दाखल करण्यात आली. त्यांच्या विरोधात बोर्डीकर गटाचे जामकर होते. हात उंचावून मतदान झाले असता चोखट यांच्या बाजूने ११ संचालकांनी मतदान केले. उर्वरित सहा संचालक जामकर यांच्या बाजून राहिले तर एकाने तटस्थ भूमिका घेतली.

Web Title: chokat at Parbhani district bank president post