आरुषी अपहरणाचा तपास सीआयडीकडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

नागपूर - गोंदिया जिल्ह्यातील बहुचर्चित आरुषी आनंदराव सूर्यवंशी अपहरण प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीला सोपविण्याचे आदेश मंगळवारी (ता. 17) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणाशी निगडित दस्तावेज आठवडाभरात सीआयडीला सोपविण्याचे आदेश आमगाव पोलिसांना दिले आहेत. 

आमगाव येथील पाच वर्षीय आरुषी 20 जुलै 2013 रोजी घराजवळच मैत्रिणीसोबत खेळत होती. या वेळी अज्ञात आरोपींनी तिचे अपहरण केले. या प्रकरणी आरुषीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, घटनेच्या तपासात पोलिस निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप असलेली याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली. सुनावणीदरम्यान घटनेचा तपास करीत असलेले पोलिस निरीक्षक पी. डी. पांढरे यांनी तपासामध्ये अनेक त्रुटी ठेवल्याचा आक्षेप घेण्यात आला. तसेच आरोपी फरार होण्यामध्येही पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. 

या अपहरणामध्ये आरुषीच्या पालकांनी काही जणांवर संशय व्यक्त केला आहे. परंतु, पांढरे यांनी आरुषीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा सीबीआयला सोपवावे, अशी विनंती करण्यात आली. याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने आरुषी अपहरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. ओम गुप्ता, तर सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश नायक यांनी बाजू मांडली.

Web Title: CID to investigate the kidnapping of aarushi case