एमआयडीसीत सिनेस्टाइलने खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

नागपूर : पाठलाग करणाऱ्या युवकाच्या तावडीतून सुटण्यासाठी मोबाईल चोरट्याने रस्त्यावरील भाजीच्या दुकानातील चाकू हिसकला आणि पाठीमागे धावणाऱ्या युवकाला फेकून मारला. मारलेला चाकू थेट युवकाच्या छातीत खुपसल्याने त्याचा मृत्यू झाला. हे एखाद्या चित्रपटातील दृश्‍य नसून एमआयडीसी परिसरातील घडलेली घटना आहे. सचिन देवीदास गोरले (38, रा. राय टाउन-2, इसासनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी सतीश हा आयसी चौक परिसरातील बाजारात एका अंडाविक्रीच्या दुकानात काम करतो. तर सचिन गोरले हा प्रॉपर्टी डिलर असून त्याला दारूचे व्यसन होते. शनिवारी दुपारी सचिन हा मित्र मुकेश चरणदास मंडले (41, रा.

नागपूर : पाठलाग करणाऱ्या युवकाच्या तावडीतून सुटण्यासाठी मोबाईल चोरट्याने रस्त्यावरील भाजीच्या दुकानातील चाकू हिसकला आणि पाठीमागे धावणाऱ्या युवकाला फेकून मारला. मारलेला चाकू थेट युवकाच्या छातीत खुपसल्याने त्याचा मृत्यू झाला. हे एखाद्या चित्रपटातील दृश्‍य नसून एमआयडीसी परिसरातील घडलेली घटना आहे. सचिन देवीदास गोरले (38, रा. राय टाउन-2, इसासनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी सतीश हा आयसी चौक परिसरातील बाजारात एका अंडाविक्रीच्या दुकानात काम करतो. तर सचिन गोरले हा प्रॉपर्टी डिलर असून त्याला दारूचे व्यसन होते. शनिवारी दुपारी सचिन हा मित्र मुकेश चरणदास मंडले (41, रा. इंदिरामातानगर) याच्यासह आयसी चौकातील देशी दारूच्या भट्टीमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी दारू पिताना सचिनने आपला मोबाईल चार्जिंगवर लावला होता. त्यावेळी आरोपी सतीशही तेथे आला. सतीश दारू प्यायला व चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करीत असताना सचिनने त्याला बघितले. त्याला विचारणा केली असता तो पळून जाऊ लागला. सचिनने त्याचा पाठलाग केला. तो शेजारच्या भाजीबाजारात पळून जाऊ लागला. सचिनने पाठलाग करताना आरडाओरड केल्याने काहींनी त्याला पकडले. चार ते पाच लोकांनी त्याला पकडून ठेवले होते व दहा ते बारा फूटावर सचिन उभा होता. त्यावेळी आरोपी सतीशने बाजूच्या भाजीच्या दुकानातून चाकू घेतला व एका हाताने सचिनच्या दिशेने भिरकावला. चाकू थेट सचिनच्या छातीत घुसल्याने तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला.त्याला ताबडतोब लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्यासह पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला व आरोपीला ताब्यात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CineStyle murder in MIDC