नागपुरात रोडरोमिओला नागरिकांकडून बेदम चोप(व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

महाविद्यालयात जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत असलेल्या तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला नागरिकांनी चांगलेच बदडले व पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बसस्थानक परिसरात गुरुवारी दुपारी घडला. संदीप रमेश निंबुरकर (२६, गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमिओचे नाव आहे.

कळमेश्वर - महाविद्यालयात जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत असलेल्या तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला नागरिकांनी चांगलेच बदडले व पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बसस्थानक परिसरात गुरुवारी दुपारी घडला. संदीप रमेश निंबुरकर (२६, गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमिओचे नाव आहे.

माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणींसह नागपूर येथील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असून धापेवाडा गावातून बसने महाविद्यालयात ये-जा करते. पीडित विद्यार्थिनी १२ जुलैला दुपारी बारा वाजता महाविद्यालयात जाण्यासाठी कळमेश्वर बसस्थानकावर तिच्या मैत्रिणीसह थांबली होती. आरोपीने साडेबाराच्या सुमारास या विद्यार्थिनीकडे एकटक बघून अश्‍लील हातवारे केले. त्यावर पीडितेच्या मैत्रिणीने आरोपीला जाब विचारला असता तो तेथून निघून गेला. परंतु, गुरुवारी दुपारी १.४५ वाजता संदीप हा पुन्हा बसस्थानकावर दुचाकीने आला व पीडितेला ‘मला तुझ्याशी मैत्री करायची आहे’ असे बोलू लागला. पीडितेच्या मैत्रिणीने त्याला हटकले असता तिला अश्‍लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार परिसरात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी संदीपला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens beat roadromeo in nagpur