यवतमाळ - खडका ग्रामस्थांचा पाण्यासाठी तहसिलवर यल्गार

सचिन शिंदे 
गुरुवार, 17 मे 2018

आर्णी (यवतमाळ) : तालुक्यातील खडका ग्रामस्थांनी (ता 17) दुपारी बारा वाजता तहसिल कार्यालयावर घागर मोर्चा आणुन सरकारचा निषेध केला. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी म्हणून मंडळ अधिकारी पी. एस. चव्हाण यांना निवेदन देऊन पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा म्हणून मागणी केली. 

तालुक्यातील खडका गाव म्हणजे पैनगंगा, अडाण, अरूणावती या तीन नदीच्या संगमावरील तेराशे लोकवस्तीचे गाव. जीथे पावसाळ्यात पुराच्या पाण्यापासून स्वतःचे जीव वाचवावे लागते. त्याच खडका गावात दरवर्षी उन्हाळ्यात पीण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही शोकांतिका आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रशासकीय यंत्रणाचे नियोजन शुन्य कारभार आहे. त्याचा त्रास मात्र ग्रामस्थांना सहन करावा लागतो. मागील दोन महिन्यांपासून गावात पिण्याचे पाणी नाही म्हणून पंचायत समितीला सरपंच कृष्णा कणाके यांनी कळवले, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. या भागात पाण्याची भीषण टंचाई असुनही खडका, चिमटा, बारभाई, सुभाषनगर, पाळोदी या पाच गावाकरीता तीन टँकर सुरू केले. त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने एका गावात चार पाच दिवसानंतर टँकर येतो.

त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी  तहसिल कार्यालयावर घागर मोर्चा आणला. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. तसेच  पंचायत समिती सभापती सुर्यकांत जयस्वाल, बाळासाहेब शिंदे, सरपंच कृष्णा कणाके, अहेमद तव्वर, सुरेश महल्ले, मंगला मेश्राम, लक्ष्मी राठोड, अंबिका महल्ले सह शेकडो ग्रामस्थ घागर मोर्चात सहभागी झाले होते. 

Web Title: citizens of khadka raaly on tehsil office for water