किळसवाणा प्रकार! मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींवर केला अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर

Citizens' march against the headmaster at Wardha
Citizens' march against the headmaster at Wardha

सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : भोसा गावातील उच्च प्राथमिक केंद्र शाळेतील मुख्याध्यापकाने 11 फेब्रुवारीला दोन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ भोसा ग्रामस्थांनी व सिंदी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी संयुक्तरित्या शुक्रवारी (ता. 14) स्थानिक बाजार चौकातून निषेध मोर्चा काढला. घटनेच्या विरोधात सिंदीच्या रस्त्यावर जनआक्रोश उसळला होता. 

मुख्याध्यापक सतीश बजाईत हा पाचव्या व दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर तीन महिन्यांपासून शाळेतील स्वयंपाक खोलीत अत्याचार करीत होता. सतत होत असलेल्या अत्याचारामुळे मुली घाबरल्या होत्या. त्यामुळे त्या शाळेत जायलासुद्धा घाबरत होत्या. एक एकेदिवशी पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने याबाबत आईला सांगितले. 

आईने दुसऱ्या दिवशी पतीला ही बाब सांगितली. यानंतर त्यांनी शाळा गाठत वर्ग शिक्षिकेला घटनेची माहिती दिली. शिक्षिकेने पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. यानंतर आई-वडिलांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मुख्याध्यापक प्रशिक्षणासाठी समुद्रपूरला गेला होता. पोलिसांनी समुद्रपूर गाठत आरोपी मुख्याध्यापकला अटक केली. यानंतर मुख्याध्यापकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. 

या घटनेच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांचा मोर्चा शहराच्या मुख्य मार्गाने घोषणा देत बस स्थानक चौकात धडकला. येथे संतप्त मोर्चेकरांनी अशा प्रवृत्तीचे प्रतिकात्मक दहन करून निषेध नोंदवला. पुढे मोर्चा पोलिस ठाण्यात धडकला. प्रशासनाच्या वतीने मोर्चाला समोर जाताना समुद्रपूरचे नायब तहसीलदार के. डी. किरसार, सिंदीचे ठाणेदार प्रशांत काळे, सेलूचे ठाणेदार सुनील गाडे, सहायक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी सर्वपक्षीय तसेच प्रहार जनशक्ती पक्ष, आधार संघटना, जनता दरबार, युवक कॉंग्रेस आदींनी वेगवेगळे निवेदन दिले. 

मोर्चात माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, कॉंग्रेसचे गटनेता आशीष देवतळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत तिजारे, आधार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम खडसे, भोसाच्या सरपंच पिंकी अंडरस्कर, उपसरपंच नमिता महंतारे, नगरसेविका वनिता मदनकर, अजया साखळे, बबनराव हिंगणेकर, सुधाकर खेडकर, भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण सिर्शिकार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष वसंता सिरसे, शेतकरी संघटनेचे प्रमोद शिंदे, सुधाकर घवघवे, तुषार हिंगणेकर, बाबाराव सोनटक्के, अशोक कलोडे, गजानन खंडाळे, शिरीष डकरे, प्रभाकर कलोडे, अफझल बेरा, ओमप्रकाश राठी, रामेश्‍वर घंगारे, गुल्लू भन्साळी, शुभम झाडे, प्रवीण अंडरस्कार, शुभम महंतारे, प्रवीण भारसाखरे, ज्ञानेश्‍वर चौधरी, मंगेश मिस्किन, सूरज आस्थानकार आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच शहरातील विविध संघटना, राजकीय पक्ष, शाळा महाविद्यालय, व्यापारी मंडळ, क्रीडा मंडळे, आदींचे सर्वपदाधिकारी तसेच भोसा गावातील ग्रामस्थ व सिंदी शहरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निवेदनातून केलेल्या मागण्या

  • दोन्ही पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवावा. 
  • पीडितेची बाजू मांडण्यासाठी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. 
  • दोन्ही पीडित मुलींना निर्भया निधीतून ताबडतोब आर्थिक मदत करावी. 
  • दोन्ही पीडित मुलींना शिक्षण पूर्ण होताच सरकारी नोकरीत किंवा वर्धा जिल्हा परिषद सेवेत समाविष्ट करण्याचे लिखित आश्‍वासन द्यावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com