खामगाव - तालुक्यातील आवार येथे गाणे वाजविण्यावरून दोन समुदायात हाणामारी होवून दगडफेक झाल्याची घटना ता. १३ मार्च रोजी घडली. यामध्ये ७ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी ३५ जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून २० पेक्षा अधिक व्यक्तींना अटक केली आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने आवार गावात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आवार येथील काही तरूण धुलीवंदन असल्याने रंग खेळून शेतामध्ये जेवन करण्यासाठी गेले होते. त्यानंतर मॅजीक गाडीने गाणे वाजवत घराकडे रस्त्याने येत असताना दुसऱ्या समुदायातील तरूणांसोबत गाणे वाजिवण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.
यावेळी लोखंडी रॉड, काठीने मारहाण झाली तसेच एका गटाने तुफान दगडफेक सुध्दा केली. यामध्ये ७ ते ८ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आवार गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत नागरिकांना पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
यानंतर सायंकाळी एसपी विश्व पानसरे, एएसपी श्रेणीक लोढा, डिवायएसपी प्रदीप पाटील यांनी गावात जावून पाहणी केली व गावकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान दंगाकाबु पथक, वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार यासह पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सद्या गावात शांतता असून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दोन्हीकडील ३५ जणांविरूध्द गुन्हे दाखल
उपरोक्त प्रकरणात खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अमोल गजानन घनमोडे याने दिलेल्या तक्रारीवरून, शेख आणि शेख शेरु, शेख अन्वर शेख समशेर, शेख इतेशान शेख शाकीर, शेख वकार शेख अहमद, शेख राजीक शेख सरदार, शेख रेहाण शेख अफसर, इम्रान मीर्झा हुसेन मीर्झा, शेख आवेश शेख समशेर, अमीर खान जाबीर खान, शेख असिफ शेख अब्बास, शेख वाजीद शेख रौउफ, शेख इरफान अब्दुल गाणी, ग्यासुद्दीन ईक्रमोदीन, अली शेख शेख सलीम, शेख रिजवान शेख रोशन, शेख जमीर शेख रोशन, शेख जमीर शेख शब्बीर, शेख निसार शेख हबीब, शेख सदाम शेख फारुख, शेख सदाम शेख निसार, जावेद खान अप्पु, सर्व रा. आवार तर शेख सदाम फारुख याच्या तक्रारीवरून जयेश अनिल खराबे, राम भागवत गावंडे, शाम भागवत गावंडे, देवा सोपान खराबे, गणेश वांदे, गोपाल निंबाळकर, तेजस मांजरे, अमोल घनमोडे, सागर लांडे, डिगनेश वांदे, दत्ता वांदे, तुका गावंडे, पोपट गावंडे, गोपाल गावंडे रा.आवार अशा ३५ जणांविरूध्द कलम109,118(1),115(2), 189(3), 189(4),191(1), 191(2), 191(3), 190 BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.