अ' वर्ग पालिकेचा 'ढ' कारभार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

यवतमाळ : कधी काळी राज्यभरात लौकिक असलेल्या नगरपालिकांमध्ये यवतमाळच्या नगरपालिकेची ओळख होती. आदर्श मॉडेल म्हणून राज्यस्तरावर नगरपालिकेचा गौरव झाला. अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. राजकीय रस्सीखेच वाढल्याने "अ' वर्ग असलेल्या येथील नगरपालिकेचा कारभार मात्र, आता "ढ' वर्गाकडे सुरू आहे.

यवतमाळ : कधी काळी राज्यभरात लौकिक असलेल्या नगरपालिकांमध्ये यवतमाळच्या नगरपालिकेची ओळख होती. आदर्श मॉडेल म्हणून राज्यस्तरावर नगरपालिकेचा गौरव झाला. अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. राजकीय रस्सीखेच वाढल्याने "अ' वर्ग असलेल्या येथील नगरपालिकेचा कारभार मात्र, आता "ढ' वर्गाकडे सुरू आहे.

बाळासाहेब चौधरी यवतमाळचे नगराध्यक्ष असताना नगरपालिकेने राज्यभर आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्या काळात राज्यातील इतर नगरपालिकेसमोर यवतमाळ पालिकेचा आदर्श होता. अनेक जिल्ह्यांतील पथकांनी पालिकेला भेटी दिल्या होत्या. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात पालिकेने राज्यभर आपल्या कार्याचा डंका वाजविला होता. सध्या राजकीय हेवेदावे, वर्चस्वाची लढाई, राजकीय पक्षामध्ये सुरू असलेली श्रेयवादाची चढाओढमध्ये पालिकेचा कारभार ढेपाळल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. सध्या शहरातील रस्ते, स्वच्छता व हद्दवाढ भागातील नालीचा प्रश्‍न मोठे आहेत. चर्चा, आंदोलन, भेटीगाठी होऊनही यावर तोडगा निघालेला नाही. हद्दवाढ भागातील रस्त्यांचा प्रश्‍न असतानाच आता यवतमाळ शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्याऐवजी विविध कारणांसाठी खोदकाम सुरू आहे. काही भागांत नव्याने रस्ते करण्यात आलेत. मात्र, ते रस्तेही फोडण्यात आलेत. त्यामुळे रस्ते करून काहीच फायदा झाला नसल्याची ओरड नागरिकांची आहे. शहरातील कचऱ्यांवर महिन्याकाठी जवळपास 70 लाख रुपयांचा खर्च सुरू आहे. यानंतरही शहरातील कचरा प्रश्‍न सुटलेला नाही. उलट मुख्य चौकातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. परिणामी, स्वच्छतेचा पैसा चालला कुठे, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. शहरात विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहेत. प्रत्यक्षात इतका निधी खर्च झाल्याचे कुठेही दिसत नाहीत. उलटस्थिती पूर्वीच्या तुलनेत अधिक गुंतागुतीची झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वराह प्रकडण्यावरही मोठा खर्च करण्यात आला. मात्र, यानंतरही शहरातील अनेक भागांत वराहांचा मुक्तसंचार सुरू असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी नगरपालिकेच्या विशेष सभेत केल्या आहेत. यानंतरही कोणताच तोडगा निघालेला नाही, हे विशेष.

पालिकेचा कारभार कुणाच्या हाती?
नगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष, भाजपचे बहुमत, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, अपक्ष नगरसेवक आहेत. यवतमाळ शहरातील रस्ते, नाली, स्वच्छता या विषयांवर सर्वांची ओरड सुरू आहे. सर्वपक्षीय नगरसेवक दोषींवर कारवाईची मागणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Class' charge of A Class Municipality