"स्मार्ट वॉच' टाळणारा स्वच्छता निरीक्षक निलंबित

File photo
File photo

नागपूर : सफाई कर्मचारी अनेकदा हजेरी लावून गायब होतात, असे आढळल्यानंतर महापालिकेने त्यांच्या मनगटावर जीपीएस प्रणालीयुक्त स्मार्ट वॉच दिली. या स्मार्ट वॉचचा वापर न करणारे मदन नागपुरे या स्वच्छता निरीक्षकास महापालिका प्रशासनाने निलंबित केले.
सफाई कर्मचाऱ्यांना स्मार्ट वॉच दिल्यानंतर तत्कालीन आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी अधिकाऱ्यांनाही जीपीएस प्रणालीयुक्त स्मार्ट वॉच बंधनकारक केली होती. 32 अधिकाऱ्यांना स्मार्ट वॉच दिली होती. मात्र, अजूनही सफाई कर्मचाऱ्यांत स्मार्ट वॉचबाबत असंतोष आहे. त्यामुळेच काही कर्मचारी अद्याप स्मार्ट वॉच बांधत नसल्याचे पुढे आले.
नेहरूनगर झोनमधील सक्करदरा तलावाच्या स्वच्छतेदरम्यान स्वच्छता निरीक्षक मदन नागपुरे यांच्या हाताला स्मार्ट वॉच न दिसल्याने अधिकाऱ्यांनी विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. परिणामी मंगळवारी त्यांना निलंबित केले. या कारवाईचा धसका सफाई कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. स्मार्ट वॉच सर्वांनाच बंधनकारक असून, त्याचा वापर न करणाऱ्यांना ही कारवाई इशारा असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com