esakal | यवतमाळ : सकाळी अंगण स्वच्छ करताना चोरट्यांनी पळवली महिलेची सोनसाखळी!
sakal

बोलून बातमी शोधा

सोनसाखळी चोर

यवतमाळ : सकाळी अंगण स्वच्छ करताना चोरट्यांनी पळवली महिलेची सोनसाखळी!

sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

यवतमाळ : " सावधान ! महिलांनो सकाळी अंगण झाडताय...

चोरटे तुमच्या गळ्यातील सोनसाखळी पळवू शकतात..."

होय. पुसद शहरात सोनसाखळी चोरांनी हा नवीन फंडा अमलात आणला आहे.शहरातील पत्रे-लेआउट मधील शांताकला नामदेव इंगळे या गृहिणी घरासमोरील अंगण स्वच्छ करत असताना बाईकवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी क्षणार्धात हिसकावून पोबारा केला. ही घटना गुरुवार ता. दोन रोजी सकाळी ६.५४ वाजता घडली. या घटनेने शहरात महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

हेही वाचा: दोघांचे मृतदेह वर्धा नदीपात्रात आढळले तरंगताना

भल्या पहाटे अंगण झाडणार्‍या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीवर या चोरट्यांचा डोळा होता.यापूर्वी याच पत्रे- लेआउट मधील ताई शिरमवार यांच्या गळ्यातील सोनसाखळी एक महिन्यापूर्वी बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी याच पद्धतीने पळविली होती.पोलिसांना चकमा देणार्‍या चोरट्यांनी शांताकला यांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविण्याचा डाव पुन्हा साधला. बाईक वरून या तिघा चोरट्यांनी शांताकला यांच्या घराची सुरुवातीला रेकी केली.दोघेजण बाईक घेऊन प्रा. पंचारिया यांच्या घरासमोर घरासमोर थांबले.एकजण चालत शांताकला यांच्या घरासमोर आला.त्याने क्षणात झटका मारून गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.झाडू घेऊन आरडाओरडा करत शांताकला चोरट्यामागे काही अंतर धावल्या.मात्र, बाईकवरील चोरट्यांनी धूम ठोकली.

हेही वाचा: 'सोबत यायचं नव्हतं तर मग युती केलीच कशाला?'

या घटनेची तक्रार वसंत नगर पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.पोलिसांनी पंचनामा केला.हे चोरटे शांताकला त्यांच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.तसेच पंचरिया याच्या घरासमोर बाईक वर उभे असताना दोन चोरटे प्रा. केशव चेटुले यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडले आहेत. यापूर्वी देवदर्शन अथवा बाजारपेठेत निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविण्याचे प्रकार पुसद शहरात घडले आहेत.आता मात्र या चोरट्यांनी अंगणात स्वच्छता करणाऱ्या महिलांना टारगेट केले आहे.पोलिसांनी हे चोरटे शहराबाहेरील हिंगोली परिसरातील असावेत, अशी शंका व्यक्त केली.पोलीस तपास सुरू आहे.

loading image
go to top