esakal | दोघांचे मृतदेह वर्धा नदीपात्रात आढळले तरंगताना
sakal

बोलून बातमी शोधा

दोघांचे मृतदेह वर्धा नदीपात्रात आढळले तरंगताना

दोघांचे मृतदेह वर्धा नदीपात्रात आढळले तरंगताना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : तालुक्यातील बोरगाव धांदे येथील दोन युवकांचे मृतदेह धामणगाव तालुक्याच्या सीमेवर मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील हद्दीत आपटी येथील वर्धा नदीपात्रात आढळल्याने खळबळ उडाली. बोरगाव धांदे येथील पंकज आनंदराव दंडागे (२७) व नरेश हरीभाऊ नेताम (३७) अशी मृतांची नावे आहेत. मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर बोरगाव धांदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पुलगाव पोलिस अधिक तपास करीत आहे.

प्राप्त माहितीनुसार, धामणगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या विटाळा गावाच्या पुढे पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आपटी शेतशिवारात वर्धा नदी पात्रात दोन इसम तरंगत असताना मंगळवारी दिसले. त्यावरून पुलगाव पोलिसांनी पोहणाऱ्याच्या मदतीने नदीच्या पात्रातून मृतदेह बाहेर काढले. त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

हेही वाचा: मेहुण्याला वाचवायला गेला अन् विहिरीत बुडून मेला

दरम्यान, शवविच्छेदन पुलगाव येथील रुग्णालयात करण्यात आले. मृताच्या नातेवाइकांनी मृत हे आपटी शेतशिवार पुलगाव हद्दीत कशाला गेले असा आक्षेप घेतला होता. त्यांच्यावर बोरगाव धांदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून मंगरूळ दस्तगिरचे ठाणेदार सूरज तेलगोटे, बोरगाव धांदे येथील पोलिस पाटील रवींद्र धांदे हे हजर होते. दोन्ही मृत युवक ३० ऑगस्टला घरून गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अधिक तपास पुलगाव पोलीस करीत आहे.

loading image
go to top