गॅसकिटच्या स्कूलव्हॅन बंद करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

वरुड (जि. अमरावती) : शहर शिक्षणाच्या बाबतीत महत्त्वाचे असल्याने कॉन्व्हेंटपासून महाविद्यालयापर्यंत दररोज विद्यार्थ्यांची वर्दळ असते. विशेषतः कॉन्व्हेंटपासून प्राथमिक आणि हायस्कूलचे विद्यार्थी स्कूलव्हॅनमधून प्रवास करीत शाळेत येतात. यामध्ये सर्वाधिक स्कूलव्हॅन या गॅसकिटवर चालतात. त्यामुळे कुठल्याही वेळी अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा स्कूलव्हॅनवर बंदी घालण्याची मागणी येथील महिला विकास मंचाने ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

काही दिवसांपूर्वीच वरुड शहरात गॅसकीट लावलेल्या एका स्कूलव्हॅनला रस्त्यालगत पेट घेतल्याची घटना घडली. अमरावती येथे कोंबून बसविलेल्या विद्यार्थ्यांच्या स्कूलव्हॅनचा अपघात होऊन त्यात दोन विद्यार्थ्यांचा बळी गेल्याची घटना घडली होती. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या जिवाशी सुरू असलेला स्कूलव्हॅनचा खेळ बंद करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यावर आवर घालण्यासाठी शहरातील जागृत महिलांनी महिला विकास मंत्र्यांच्या नेतृत्वात ठाणेदारांशी चर्चा करून आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
ठाणेदारांनी स्कूलव्हॅनवर नियंत्रण ठेवावे. तांत्रिक बाबीची पूर्तता असलेल्या व्हॅनलाच विद्यार्थी वाहतुकीची परवानगी द्यावी, यामध्ये विशेष करून गॅसकीट बसवलेल्या वाहनांना स्कूलव्हॅन म्हणून चालवण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणीदेखील महिलांनी केली आहे. या वेळी महिला विकास मंचच्या अध्यक्ष माया यावलकर, दिलीप टाकरखेडे, राहुल परिहार, मंगला कुकडे, अरुणा बहिरे, डॉ. मीना बंदे, सुनील चौधरी, पाणी फाउंडेशनच्या आरती खडसे आदी उपस्थित होत्या.
पालकमंत्र्यांना केले अवगत
गॅसकिट बसवलेल्या स्कूलव्हॅनमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असून ते अत्यंत धोक्‍याचे आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना माहिती देण्यात आली आहे. पालकमंत्री या गंभीर विषयावर लवकरच बैठक घेणार असल्याचे माया यावलकर यांनी सांगितले. तसेच वाहनचालकांना गॅसकिट काढण्याची सूचना दिल्यास त्यांच्यावर ही अन्याय होणार नसल्याने त्या म्हणाल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close the school van of the gaskit