‘जंक फूड’ बंदीसाठी ‘क्‍लस्टर’ समिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

नागपूर - विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये ‘जंक फूड’च्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) घेतला आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालकांनी कारवाईस सुरुवात केली आहे. तसेच सहा ते आठ महाविद्यालयांतील प्राचार्य व विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ‘क्‍लस्टर’ समिती तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

देशातील महाविद्यालयांमधील कॅंटीनमध्ये पिझ्झा व बर्गरसारखे जंक फूड विकले जाते. या पदार्थांचे विद्यार्थ्यांमध्येही आकर्षण आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांचे वजन अतिप्रमाणात वाढते असा आरोग्यतज्ज्ञांचा अहवाल आहे. युजीसीने त्याची गंभीर दखल घेतली असून, जंक फूडवर बंदी घालतानाच विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि दुष्परिणामांबाबत जागृती करण्याच्या सूचनाही  दिल्या आहेत. यात विद्यार्थ्यांना ‘बॉडी मास्क इंडेक्‍स’ (बीएमआय) बद्दल माहिती दिली  जावी असे निर्देशही युजीसीचे सचिव प्रा. डॉ. जसपाल संधू यांनी विद्यापीठांना पाठवलेल्या परिपत्रकात दिले आहेत.
पत्राच्या आधारावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने महाविद्यालयांना जंक फूड बंदीचे आदेश देण्यात आले. ३० डिसेंबरला विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्यांनी पत्र काढून विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांपैकी सहा ते आठ महाविद्यालयातील प्राचार्य आणि विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तयार करण्याचे निर्देश दिले. ही समिती विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयातील कॅंटीनमध्ये जंक फूड विकल्या जात आहे काय? याची तपासणी करेल. शिवाय महाविद्यालयाअंतर्गत यासंदर्भात कौन्सिलिंग आणि इतर कामे करणार आहे. यामध्ये प्राचार्य आणि विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्याची पदे अनिवार्य करण्यात  आली आहेत.

Web Title: cluster committee for junk food ban