इतिहासकारांकडून शंभूराजांवर अन्याय: मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

जीवन प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी
शंभूराजेंनी औरंगजेबाला जन्मभर झुंजवत ठेवले. छत्रपतींच्या स्वराज्याचे संरक्षण करीत लढायामागून लढाया जिंकत त्यांनी पराक्रम घडविला. त्यांचा अंतही हजारोंना प्रेरणा देणारा आहे. लढवय्ये, विद्वान शंभूराजेंचे कर्तृत्व शिवराज्यांचा पुत्र शोभावे, असेच आहे. त्यांचे जीवन प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी महानाट्याच्या निमित्ताने नागपूरकरांना मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नागपूर : छत्रपती शिवाजी राजांचा पुत्र शोभावे असा पराक्रम शंभूराजांनी गाजविला. परंतु, इतिहासकारांनी शंभूराजांवर अन्याय केला, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केले.

माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व मोहन मते परिवारतर्फे रेशीमबाग मैदानावर शनिवारपासून आयोजित "शिवपुत्र संभाजी' ऐतिहासिक महानाट्याचे उद्‌घाटन शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती पी. एन. देशमुख, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार आणि माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते, उपमहापौर दीपराज पार्डीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे, महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते महेंद्र महाडीक, एसीसी सिमेंटचे प्रबंध संचालक नीरज आखोरी, पंकज बाबरिया होते. मुख्यमंत्र्यांचे पेशवाई पगडीने तर अन्य मान्यवरांचे मराठमोळी पगडी घालून स्वागत करण्यात आले. गडकोट किल्ल्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. महानाट्याच्या मध्यंतरादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

जीवन प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी
शंभूराजेंनी औरंगजेबाला जन्मभर झुंजवत ठेवले. छत्रपतींच्या स्वराज्याचे संरक्षण करीत लढायामागून लढाया जिंकत त्यांनी पराक्रम घडविला. त्यांचा अंतही हजारोंना प्रेरणा देणारा आहे. लढवय्ये, विद्वान शंभूराजेंचे कर्तृत्व शिवराज्यांचा पुत्र शोभावे, असेच आहे. त्यांचे जीवन प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी महानाट्याच्या निमित्ताने नागपूरकरांना मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Web Title: CM Devendra Fadnavis says Injustice on Shambhaji Maharaj from historians