विरोधकांचे आंदोलन म्हणजे "कव्हर फायर' : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

गोंदिया : "ईव्हीएम'विरोधात असलेले विरोधकांचे आंदोलन म्हणजे त्यांनी आपली हार मान्य केली आहे. ते या आंदोलनाच्या माध्यमातून "कव्हर फायरिंग' करत जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आज, रविवारी केली. विरोधकांचा 21 ऑगस्ट रोजी "ईव्हीएम'विरोधात महामोर्चा निघणार आहे. मात्र, या महामोर्चानंतरही त्यांचा महापराभवच होणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाजनादेश यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार रमेश कुथे, माजी जि. प. अध्यक्ष नेतराम कटरे, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, विनोद अग्रवाल आदी उपस्थित होते.
भाजप-शिवसेनेत युती होणार असल्याचे सांगत गोंदिया विधानसभेची जागा भाजपच्या वाट्याला आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील पहिला बायोगॅस प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे तयार करणार आहे. गेल्यावेळी आम्ही ज्याप्रमाणे धानाला 500 रुपये बोनस दिला. तसेच येत्या वेळेसही देऊ. त्याचबरोबर एकूण कामे जर पाहिली, तर रस्ते, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने लक्षणीय कामे केली. एकूण आकडेवारी पाहिली तर आधीच्या सरकारपेक्षा दुपटीने काम केली आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, संपूर्ण देश हा सत्ताविरोधी नसून त्यांच्या बाजूने आहे. तर तीच परिस्थिती आज राज्यात निर्माण झाली आहे. जनतेची मानसिकता बनलेली असून मोदीजींना साथ देणारे सरकार त्यांना राज्यातही आणायचे, असे जनतेने ठरवलेले आहे. आणि जनता आम्हाला पुन्हा संधी देणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM devendra fadnvis critised opposition leaders