मुख्यमंत्री जिंकले; मात्र दोन जागा गमावल्या| Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पश्‍चिम आणि उत्तर नागपूरमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे येथील दोन्ही उमेदवार बदलण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपला दक्षिण-पश्‍चिमचा गड पुन्हा राखला असला तरी त्यांना दोन सहकारी गमवावे लागले. 
पश्‍चिम आणि उत्तर नागपूरमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे येथील दोन्ही उमेदवार बदलण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. पाच वर्षानंतर पुन्हा शिवसेनेसोबत युती झाली असली तरी भाजपने जिंकलेल्या जागा सोडायच्या नाही असा निर्णय घेतला. शिवसेनेने दक्षिण नागपूरवर दावा सांगतिला होता. मात्र त्यांच्यासाठी एकही जागा सोडण्यात आली नाही. त्यामुळे शिवसैनिकांची नाराजी भाजपने ओढावून घेतली. सर्वच मतदारसंघात याचा फटका भाजपला बसल्याचे मताधिक्‍यांवरून दिसून येते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारल्याने तेली व ओबीसी समाजानेसुद्धा मतादनातून आपली नाराजी दर्शवल्याचे स्पष्ट होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The CM won; However, two seats were lost