"केम' गैरव्यवहार प्रकरण : निवृत्त व विद्यमान पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना अटक

File photo
File photo

अमरावती : समन्वयीत कृषी विकास प्रकल्प (केम) मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त पशुसंवर्धन अधिकाऱ्यासह एका विद्यमान अधिकाऱ्यालाही आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली.
डॉ. विवेक नारायण भारदे (वय 57 शेवगाव, अहमदनगर) व यशवंत ज्ञानोबा वाघमारे (वय 43 रा. पिंपळेतिलक, पुणे) अशी अटकेतील दोघांची नावे असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी भारदे हे निवृत्त झाले असून, वाघमारे हे पदावर कार्यरत आहेत. या दोघांच्या पत्नींनी पुणे येथे सोल्यास कंपनीची स्थापना केली. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा अशा सहा जिल्ह्यात केम प्रकल्प सुरू असताना, सोल्यास कंपनीची नोंदणी व्हायची होती. असे असताना तत्कालीन संचालक गणेश चौधरी यांनी आपल्या अधिनस्थ जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना आदेश दिले व 1 कोटी 34 लाख रुपयामध्ये सोल्यास कंपनीला कंत्राट दिला. अंकेक्षण अहवालामध्ये त्यासंदर्भातील उल्लेख आला आहे. त्यानंतर या दोघांनाही आर्थिक गुन्हेशाखेने नोटीस बजावली. त्यांचे बयाण घेतले. अखेर दोघांनाही शनिवारी (ता. 14) रात्री अटक केली. रविवारी (ता. 15) दोघांनाही विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सोल्यास कंपनीमध्ये डॉ. भारदे यांची पत्नी संचालक असून, ते स्वत: या कंपनीचे मानद संचालक असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या बयाणात स्पष्ट केले. शिवाय वाघमारे यांचीही पत्नी आणि भाचा या कंपनीचे संचालक असल्याची बाब आर्थिक गुन्हेशाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आली. गणेश चौधरींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बुधवारी (ता. 18) सुनावणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com